शेतकर्‍यांनी स्ववर्गणीतुन ओढ्याचे केले खोलीकरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

येवला- तालुक्यातील अंगुलगाव येथील आठ शेतकर्‍यांनी स्वत: वर्गणी करुन ९० हजार रुपये जमवले. या पैशातुन गावाजवळील ओढ्याचे ५०० मिटर खोलीकरण केले. यामुळे या वर्षीच्या पावसाळ्यात या ठिकाणी पाणी आडले जाऊन ६० एकर जमिन ओलीताखाली येणार आहे.

येवला- तालुक्यातील अंगुलगाव येथील आठ शेतकर्‍यांनी स्वत: वर्गणी करुन ९० हजार रुपये जमवले. या पैशातुन गावाजवळील ओढ्याचे ५०० मिटर खोलीकरण केले. यामुळे या वर्षीच्या पावसाळ्यात या ठिकाणी पाणी आडले जाऊन ६० एकर जमिन ओलीताखाली येणार आहे.

पंचायत समिती सदस्य प्रविण गायकवाड यांनी येथे भेट देऊन या कामाची पहाणी केली. येथील शेतकर्‍यांनी एकत्र येत पाण्याचे महत्व ओळखून पाणी आपल्या जमीनीत जास्त मुरले पाहिजे तरच येणार्‍या पिढीला पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी उपलब्ध होईल. त्यासाठी जिथे पाणी अडवता येईल तिथे पाणी अडवून भुगर्भाची भुजल पातळी वाढवण्यासाठी येथील प्रभाकर साबळे, भागवत साबळे, सवित्राबाबा जानराव, राजकुमार जाधव, नवनाथ लांडगे, पांडुरंग लांडगे, राजाराम जाधव, काळु जाधव, दत्तात्रय जाधव या आठ शेतकर्‍यांनी एकत्र येत स्वत: ९० हजार वर्गणी जमा करुन येथील ओढ्याचे ५०० ते ६०० मिटर खोलीकरणाचे व दुरुस्तीचे काम केले. 

खोलीकरण मुरुम लागेपर्यंत केल्याने परकुलेशन चांगल्या प्रकारे होऊन येथील क्षेत्रातील विहिरींचा पाणी साठा वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असून शेतकर्‍यांचे उत्पन्नही वाढणार आहे. याच ओढ्यावर सिमेंट बांध असून याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी यावेळी शेतकर्‍यांनी गायकवाड यांच्याकडे केली आहे. बंधारा दुरुस्त केल्यास पाणी गळती थांबवणार आहे. 

अंगुलगाव येथील आठ शेतकरी बांधवांनी स्वत: ९० हजार रुपये वर्गणी जमा करुन मोठे जलयुक्तचे काम केले आहे. येणार्‍या पिढीला याचा मोठा फायदा होईल. त्यामुळे या शेतकरी बांधवांचे मनापासून अभिनंदन करतो. या शेतकर्‍यांप्रमाणेच इतर शेतकर्‍यांनी आपल्या शेताजवळ जलयुक्तचे काम उभे करावे. 
- प्रविण गायकवाड, सदस्य, पंचायत समिती येवला

Web Title: The farmers made their own canal

टॅग्स