दूध बंद आंदोलनाच्या तयारीसाठी शेतकरी मेळावा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

श्रीरामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यात पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाच्या तयारीसाठी कारेगाव ( ता. श्रीरामपूर ) येथे खासदार राजू शेट्टी याच्या उपस्थितीत गुरुवार (ता.१२)  सकाळी ११ वाजता शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

श्रीरामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यात पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाच्या तयारीसाठी कारेगाव ( ता. श्रीरामपूर ) येथे खासदार राजू शेट्टी याच्या उपस्थितीत गुरुवार (ता.१२)  सकाळी ११ वाजता शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

मेळाव्यास जेष्ठ नेते दशरथ सावंत, माणिक कदम घनश्याम चौधरी, रवी मोरे, अंबादास कोरडे, डॉ. अशोक ढगे, सुनील लोंढे, संतोष गायकवाड, दत्तात्रय फुंदे, विठ्ठल शेळके, शंकर लहारे आदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रताप पटारे यांनी दिली. 
राज्यात दुधाच्या दराचा प्रश्न गंभीर झाला आहे. दुधाचे दर प्रतिलिटर २७ रुपयवरून १६ रुपयावर आले आहेत. दुधाच्या उत्पादन खर्चासाठी ३० रुपये प्रति लिटर खर्च येतो. दूध धंदा तोट्यात गेला आहे. भाजपच्या सरकारने शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगण व गोवा राज्यात सरकार शेतकऱ्यांना दुधाला अनुदान देते. पण राज्यातील दूध उत्पादकांची सरकारने फसवणूक केली आहे असे पटारे म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी ता .१६ पासून मुंबईला जाणारे दूध रोखणार आहे. मुंबईची दूध कोडी केली जाणार असून ३० रुपये दर मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. या आंदोलनाच्या तयारीसाठी कारेगाव येथे शेतकरी मेळावा आयोजित केला आहे, या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन पटारे यांनी केले आहे.

Web Title: Farmers' Meetup for preparing for milk protest