पातोंडा येथे पिक विमा कंपनीच्या अन्यायाविरोधात रास्ता रोको आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

आज (बुधवार) विमा कंपनीने पातोंडा मंडळात पिक विमा रक्कम मंजुरीत शेतक-यांवर अन्याय झाल्याच्या विरोधात पातोंडा, नांद्री, दहिवद, दापोरी, मठगव्हाण, रूंधाटी, खेडी व खौशी येथील शेतक-यांनी रास्ता रोको करत विमा कंपनी व शासनाच्या विरोधात आंदोलन पुकारले.
 

पातोंडा (अमळनेर) - येथे आज (बुधवार) विमा कंपनीने पातोंडा मंडळात पिक विमा रक्कम मंजुरीत शेतक-यांवर अन्याय झाल्याच्या विरोधात पातोंडा, नांद्री, दहिवद, दापोरी, मठगव्हाण, रूंधाटी, खेडी व खौशी येथील शेतक-यांनी रास्ता रोको करत विमा कंपनी व शासनाच्या विरोधात आंदोलन पुकारले.

या प्रसंगी तहसीलदार प्रदिप पाटील यांनी सदर पिक विमा मुल्यांकनात जो कोणी दोषी आढळून येईल त्या संबधित घटकावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन दिले. तालुका कृषी अधिकारी वारे यांनी पर्जन्यमापक यंत्र व पीक पहाणी तक्ता तयार करण्यासाठी लागणारे साहित्याची तपासणी करून त्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील अशी माहिती दिली.

जळोद शिवारात शेती असलेले शेतकरी परंतू रहिवास हा इतर गावात असल्याने त्यांना देखील प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामूळे विमा नुकसान भरपाई पासून वंचित रहावे लागले अशा वंचित शेतक-यांना न्याय देण्याचे आश्वासन वारे यांनी दिले. याप्रसंगी शेतक-यांना अरूण देशमुख, महेंद्र पाटील सर सरपंच पातोंडा, प्रसाद कापडे, शिवाजीराव पाटील, प्रा विश्वासराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी, जि. प. सदस्य मीनाताई पाटील, विनायक दादा बिरारी, अॅड. ललिता पाटील, मधुकर चौधरी, प्राची चौधरी सरपंच नांद्री, सोपान लोहार उपसरपंच पातोंडा, डाॅ. संजय पवार, अजतराव सुर्यवंशी, संभाजी बिरारी, प्रशांत पवार, निमु पवार, राजेंद्र यादव, पंडीत लाड, राकेश पाटील, नरेंद्र सैंदाणे, मच्छिंद्र वाघ, बंटी बोरसे आदी पातोंडा व पंचक्रोशीतील  शेतकरी उपस्थित होते.

यावेळी पोलिस निरीक्षक अनिल बडगूजर, हवलदार बापू साळुंखे,  पो काॅ. विजय साळुंखे,  आशिष गायकवाड, रवि पाटील यांनी शांंतता व सुव्यवस्था राखण्यात सहकार्य केले.

Web Title: farmers Movement Against Insurance Company Patonda