बिबट्याच्या हल्ल्यांमुळे शेतक-यांचे पशुधन धोक्यात

LEOPARD.jpg
LEOPARD.jpg

अंबासन (नाशिक) : ब्राम्हणपांडे (ता.बागलाण) येथील पुर्व पट्ट्यात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी भितीच्या सावटाखाली आले आहेत. शेतकरी दोधा काशीराम आहिरे यांच्या मालकीच्या शेतीतील घराशेजारी असलेल्या गोठयात दावनीला बांधलेल्या गाईच्या वासरावर बिबटयाने हल्ल्या चढवत ठार केले. बिबट्याच्या सततच्या हल्ल्यांमुळे शेतक-यांचे पशुधन धोक्यात आले आहे .

शेतकरी दोधा आहिरे हे त्यांच्या गट क्रमांक २६ मधील शेती शिवारात वास्तव्यास आहेत. शुक्रवार (ता.१४) मध्यरात्रीच्या सुमारास घराशेजारील गोठयात बांधलेल्या वासरावर बिबटयाने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे वासराने हंबरडा फोडला आणि तोच घरातील सदस्यांना जाग आली त्यांनी गोठ्याकडे धाव घेतली. बिबट्याने वासरावर हल्ला चढविल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबटयाने डरकाळया ठोकत धूम ठोकली. या आधीही बिबटयाने परिसरात अनेक जणावरे फस्त केल्याचे सांगितले जाते. येथील शेतकरी शेती व्यवसायाबरोबर दुग्धव्यवसाय करतात त्यामुळे परिसरात दुधाळ जनावरांची संख्या मोठया प्रमाणात आहे.

बिबट्याचा वावर परिसरात वाढतच चालल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळापासून जवळच डोंगर असल्याने या परिसरात नेहमीच बिबट्याचे वास्तव्य असते. गेल्या दोन महिन्यात बिबटयाने केलेल्या हल्ल्यात पाच ते सहा शेळ्या व बोकड ठार झाले असल्याची महिती येथील नागरिकांनी दिली आहे. वनविभागाने लक्ष घालावे आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतक-यांनी केली जात आहे. वनरक्षक ज्ञानेश्वर सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. वनकर्मचारी कैलास पवार उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com