पवारसाहेब..शेतकरी कैवारी सरकार लवकर स्थापन करा..! 

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

राज्यात अवकाळी पावसाने खरीप हंगामातील सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले. मंत्री, खासदार, आमदार, अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनामेही पूर्ण झाले, पण शासनाकडून मिळणारी मदत अद्यापपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली नाही. त्याबाबत शासनदरबारी कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे  "पवारसाहेब... शेतकऱ्यांचे कैवारी सरकार लवकरात लवकर स्थापन करा..! शेतकरी मदतीची वाट पाहत आहे', असे फलक ग्रामीण भागात नुकसानग्रस्त शेतकरी लावत आहेत. 

नाशिक : "पवारसाहेब... शेतकऱ्यांचे कैवारी सरकार लवकरात लवकर स्थापन करा..! शेतकरी मदतीची वाट पाहत आहे', असे फलक ग्रामीण भागात नुकसानग्रस्त शेतकरी लावत आहेत. 

ग्रामीण भागात लागताहेत फलक 

राज्यात अवकाळी पावसाने खरीप हंगामातील सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले. मंत्री, खासदार, आमदार, अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनामेही पूर्ण झाले, पण शासनाकडून मिळणारी मदत अद्यापपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली नाही. त्याबाबत शासनदरबारी कार्यवाही होताना दिसत नाही. भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकऱ्यांचे वैरी आहे, असा जणू शेतकऱ्यांनी समज करून घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौशल्यबुद्धीने नवीन सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत.

Image may contain: 1 person, outdoor, text and nature

गारपीट अन्‌ अवकाळी पावसानंतर सर्वांत प्रथम शरद पवार यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. श्री. पवार यांच्यात निर्णय क्षमता आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव आहे. राज्य व केंद्र सरकारमध्ये काम करताना अनेक शेतकरी हिताचे निर्णय त्यांनी घेतले आहेत, असे स्पष्ट मत शेतकऱ्यांचे आहे, म्हणून आपल्या भावना जाहीररीत्या व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी "शेतकरी वैरी सरकार गेले! पवारसाहेब... शेतकरी कैवारी सरकार लवकर स्थापन करा..! शेतकरी मदतीची वाट पाहतोय', अशा आशयाचे फलक लावण्यास सुरवात केली आहे. 

पवारसाहेब निर्णय घ्या अन्‌ सरकार स्थापन करा

शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहेत. शेतकऱ्यांच्या फायद्याचे निर्णय घेणार आहेत, तर का विलंब करताहेत. शेतकरी रसातळाला गेला आहे. पवारसाहेब निर्णय घ्या अन्‌ सरकार स्थापन करा. - राजेंद्र बोरगुडे, अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers requested to sharad pawar Nashik Marathi News