अंबासन परिसरातील बळीराजा मेटाकुटीला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

अंबासन : परतीच्या पावसाने उघडीप दिल्याने शेतीकामांना गती आली असून, शेतकरी कापणी व मळणीच्या कामात गुंतला आहे. परिपक्व झालेले अनेक कडधान्ये व उभी पिके पावसामुळे सडल्याने तालुक्‍यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आजही बहुतांश शेतात पाणी साचून असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यातच मजूर टंचाई निर्माण झाल्याने बाहेरच्या मजुरांना शोधावे लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

शेतात ओलावा असल्याने बळीराजा त्रस्त

१९६९ नंतर यंदा पाऊस जोरदार बरसल्याचे जाणकारांनी सांगितले. यंदा विहिरी तुडुंब भरल्या. दोन ते अडीच महिन्यांपासून नदी व नाले खळखळून वाहत आहेत. दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने उसंती दिल्याने शेतकरी कामात व्यस्त झाला आहे. यामुळे शेतीशिवार शेतकऱ्यांसह मजुरांनी फुलला होता. मात्र, शेतात आजही ओलावा असल्याने काही कामे अर्धवट ठेवून बळीराजाला घरी परतावे लागत आहे. परिसरात बाजरी, मका, भुईमूग आदी कडधान्ये कापणीसाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. बहुतांश मजूर बाहेरगावरून शेतकऱ्यांना घेऊन यावे लागत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अर्थिक फटका बसत आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पिक सडू लागली आहेत. अनेक शेतकरी नवीन कांद्याच्या धावपळ करीत आहेत. परतीच्या जोरदार पावसाने द्राक्षे व डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक बागामधील द्राक्षे मन्यांना तडे गेल्याने फवारणीसाठी केलेला लाखो रुपये खर्च पाण्यात जाणार असल्याची भिती द्राक्ष उत्पादकांमध्ये आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers suffer bad situation in ambasan