परदेशात पळणारे मोकाट, वसुलीचा सुड शेतकऱ्यांवर उगवला जात आहे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

निफाड : मोदी अन् विजय‌ मल्यासारख्यांनी लुटलेल्या रक्कमेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या असंख्य योजना बसल्या असत्या. मात्र परदेशात पळणारे मोकाट असताना शेतकऱ्यांवर वसुलीचा सुड उगवला जात आहे. त्यास प्रत्युत्तर देण्यास सज्ज रहा असे अवाहन राजेंद्र डोखळे यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या निफाड बाजार समिती सभागृहातीला अयोजित मेळाव्यास आज मार्गदर्शन करताना केले.

निफाड : मोदी अन् विजय‌ मल्यासारख्यांनी लुटलेल्या रक्कमेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या असंख्य योजना बसल्या असत्या. मात्र परदेशात पळणारे मोकाट असताना शेतकऱ्यांवर वसुलीचा सुड उगवला जात आहे. त्यास प्रत्युत्तर देण्यास सज्ज रहा असे अवाहन राजेंद्र डोखळे यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या निफाड बाजार समिती सभागृहातीला अयोजित मेळाव्यास आज मार्गदर्शन करताना केले.

या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या मेळाव्यात व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम, पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष कराड, रावसाहेब गोळे, उन्मेष डुंबरे 
सुभाष कराड, दिलिप कापसे, सागर कुंदे, बी जी पाटील, दिनकर मत्सागर, संजय सांगळे, राजेंद्र बोरगुडे, माधवराव सुरवाडे,  शांताराम‌ वडघुले, दिलिपराव चव्हाण, बाबासाहेब गुजर आदी मान्यवर उपस्थित होते. 

याप्रसंगी पुढे बोलतांना राजेंद्र डोखळे म्हणाले की प्रत्येक तालुक्याला कर्ज वितरणाचा लक्षांक‌ असतो मात्र संचालक मंडळाने कोरडवाहु तालुक्यातही जिथे सत्तर कोटी रुपये कर्ज वाटप करायला हवे तिथे तीनशे चारशे कोटी रुपये कर्ज वाटप केले. त्यावेळी स्थानिक संचालकांचे दुर्लक्ष झाले आहे. मागील वर्षी कर्जफेड करुनही पुन्हा नव्याने कर्ज भेटले नाही. त्यामुळे कर्ज भरणारे मागे राहिले. जिल्हा बँकेने नियमित कर्जफेड करणाऱ्यांना कर्ज का दिले नाही याची साधी विचारणाही केली गेली नाही.

वास्तविकता जिल्हा बँकेला थेट शेतकऱ्यांकडुन कर्ज वसुलीचा अधिकार नाही शेतकऱ्यांनी सहकारी सोसायटीकडुन कर्ज घेतले तर जिल्हा बँकेने सोसायटीला कर्ज दिले आहे. बँकेच्या वसुली पथकाने कर्जवसुली भर रस्त्यावर, गावातील चौकात करु नये एका बाजुला कर्जवसुली करताय तर दुसऱ्या बाजुला मोर्चेकऱ्यांसमोर कर्जमाफी घोषित केली जात आहे. त्यामुळे सगळेच संभ्रमात आहेत नव्याने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेचे अजुन किती अर्ज फाटे करावे लागतील याचा थांगपत्ता नाही अगोदर घोषित केलेल्या कर्जमाफीचे‌ अजुन हातात काही पडले नाही नवनविन कल्पना व घोषणांद्वारे शेतकऱ्यांना फसविण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी करुन सात बारा कोरा करा.

जिल्हा बँकेचे सुमारे 2900 कोटी कर्ज थकित आहेत शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर पिक अप‌ जप्त करु‌न ते फिटणार नाही बड्या थकबाकीदारांकडे असलेली सातशे कोटींची थकबाकी अगोदर वसुल करावी शेतकऱ्यांना कर्जफेड करण्यापुर्वी नविन कर्ज उपलब्ध होईल अशी हमी द्यावी सरकार हे खाणाऱ्यांचे रक्षण करणारे आहे पिकवणाऱ्यांचे रक्षण करणारे नाही असा टोलाही डोखळे यांनी लागावला.

निरव मोदी अन् विजय‌ मल्यासारख्यांनी लुटलेल्या रक्कमेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या असंख्य योजना बसल्या असत्या मात्र परदेशात पळणारे मोकाट असतांना शेतकऱ्यांवर वसुलीचा सुड उगवला जात आहे त्यास प्रत्युत्तर देण्यास सज्ज रहा असे अवाहनही राजेंद्र डोखळे यांनी केले.

यावेळी या मेळाव्याच्या प्रारंभी माधवराव सुरवाडे यांनी प्रस्ताविक करुन मेळावा आयोजनाची भुमिका विषद केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम, सुभाष कराड, बाबासाहेब गुजर, विश्वनाथ उशीर ,रावसाहेब गोळे, दत्तात्रय सुडके,अनिल ताजणे आदींनी मनोगतातुन जिल्हा बँक वसुली अधिकाऱ्यांची मनमानी अन शेतकऱ्यांची अवस्था यावर परखड मत व्यक्त केले. यावेळी राजेंद्र घायाळ, नंदकुमार पानगव्हाणे, राजेद्र निचित, दिलिप कापसे, सचिन जाधव आदींसह निफाड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. या मेळाव्यानंतर सर्व थकबाकीदारांनी मोर्चाद्वारे राजेंद्र डोखळे यतीन कदम सुभाष कराड यांच्या नेतृत्वात निफाड तहसिल‌ कार्यालयात जाऊन नायब तहसलिदार संघमित्रा बाविस्कर, पोलिस निरिक्षक रणजित डेरे यांना कर्जमाफी व सक्तीची कर्जवसुली आदीबाबत निवेदन सादर केले.

Web Title: farmers suffer a lot but fraud and people like this run away in foreign