शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची आस

शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची आस

सोयगाव : खरीप मातीत रब्बी तरी पिकू दे, सोयगावातील आशावादी शेतकऱ्यांना अजूनही मुसळधार पावसाची आस आहे. सोयगाव-बिगर पावसात संपुर्ण खरीप हंगाम वाया गेल्याचे शेतकऱ्यांनी यंदा प्रथमच पहिले. यामुळे खरिपाची पिके मातीतच गेली. पण ही झीज भरून काढण्यासाठी नवरात्र उत्सवात एक दोन मुसळधार पाऊस पडून रब्बी हंगाम फुलूदे अशी आर्त हाक सोयगावचा बळीराजा देत आहे.

पोळा, गणपती कोरडा गेला तरीही नवरात्र मध्ये पावसाची अपेक्षा अजूनही आशावादी शेतकऱ्यांना आहे. परिसरातील खरीप हंगाम पावसा अभावी करपला आहे. खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे. यामुळे चिंताग्रस्त शेतकरी आतातरी वरुण राजाने कृपा करावी आणि मुसळधार पाऊस पाडून रब्बी फुलवावा अशी वाट पाहून आहे. यामुळे झालेले नुकसान तरी भरून निघेल अशी अपेक्षा आहे. तलाव बंधारे कोरडी ठाक झाल्याने चारा व पाणी प्रश्न गंभीर बनत आहे. गुरेढोरे जगवायची कशी असा गंभीर प्रश्न आहे. खरीप तर गेला रब्बीची पेरणी होते का नाही याच चिंतेत शेतकरी आहे. 

सोयगाव दुष्काळी तालुका रब्बीमुक्त होतो कि काय अशी चिंता शेतकऱ्यांना आहे. दरम्यान तालुका कृषी विभागाच्या नोंदीत 86 गावांपैकी 28 गावच रब्बीची असल्याच्या नोंदी आहे. तथापि 50 च्या वर गावात रब्बीची पेरणी न होण्याची शक्यता आहे. 
त्यामुळे सोयगाव तालुक्यात रब्बीच्या हंगामाचे चित्र भयावह झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com