"बापाचं आहे..बापाला मिळायलाचं हवं.!" हतबल बळीराजाचा सरकारला इशारा

घनश्याम अहिरे : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने विविध प्रश्नांसाठी रास्तारोको आंदोलन छेडण्यात आले. ओला दुष्काळ जाहीर करावा. सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी. तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत द्यावी. विना निकष कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा. सक्तीची वीज वसुली बंद करून वीज बिल माफ करावे या मागण्यांचे निवेदन यावेळी कृषी अधिकारी अशोक पवार यांना देण्यात आले.

मालेगाव : अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहायचं सोडून सत्ताधारी खुर्चीसाठी भांडत आहेत. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेत सरकारला जाग आणण्यासाठी येथील प्रवेशद्वारासमोर बायपास रस्त्यावर मराठा महासंघाच्या युवा कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत सरकारला धारेवर धरले. "बापनं शे, बाप ले दे..!" या घोषणा देत एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सर्वपक्षीय कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले.

Image may contain: 17 people, including Suresh Lodha, people standing and outdoor

"बापनं शे, बाप ले दे..!" दाभाडीत बळीराजाचा रास्तारोको 

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने विविध प्रश्नांसाठी रास्तारोको आंदोलन छेडण्यात आले. ओला दुष्काळ जाहीर करावा. सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी. तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत द्यावी. विना निकष कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा. सक्तीची वीज वसुली बंद करून वीज बिल माफ करावे या मागण्यांचे निवेदन यावेळी कृषी अधिकारी अशोक पवार यांना देण्यात आले. यावेळी निळकंठ निकम, हेमराज भामरे, डॉ.एस.के.पाटील, हरी निकम, बापू निकम, सुभाष निकम, दिलीप निकम, प्रा.विजय शेवाळे, अमोल निकम, शेखर पवार, छोटू हिरे, शशिकांत निकम, जगदीश पावरा यांनी आंदोलकांना संबोधित करत सरकारला धारेवर धरले.

Image may contain: one or more people, crowd and outdoor

खरिपाच्या पिकासह फळबाग शेती उत्पन्न संपूर्णत: भुईसपाट झाले आहे. रब्बीच्या तयारीत व्यस्त असतांना उभं पीक पाण्यात गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सरकार सत्तास्थापणेच्या चढाओढ करण्यात दंग आहे. शेतकरी वर्गाला वाऱ्यावर सोडून देत सत्ताधारी नको त्या गोष्टी प्राधान्याने करत असल्याने उद्वेग वाढतो आहे. शेतीप्रश्नी सरकारने तात्काळ कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.यावेळी रस्त्यावर बैलगाडी व सडलेल्या शेती उत्पादने टाकून रस्ता अडवण्यात आला.

Image may contain: 2 people, crowd, shoes, tree and outdoor

यावेळी यावेळी दशरथ निकम, अरुण देवरे, अशोक निकम, ऍड सुधाकर निकम, पोलीस पाटील कारभारी निकम, तलाठी पी.पी.मोरे, वीज मंडळ व महसूल विभागाचे अधिकारी यासह मराठा महासंघाचे कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers warned government strike at dabhadi malegaon