शेतकऱ्यांनी कर्ज भरल्याशिवाय त्यांची पत निर्माण होणार नाही - सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

नाशिक - राज्यात 1.31 कोटी शेतकऱ्यांपैकी केवळ 31 लाख थकीत कर्जदार आहेत. सरकारने या थकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतलाच, तर नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी मदत दिली जाईल. यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरलेच पाहिजे, त्याशिवाय त्यांची पत निर्माण होणार नाही, अशा शब्दांत सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी शेतकरी कर्जमाफी व शेतकऱ्यांनी पीककर्ज परतफेडीबाबत घेतलेल्या असहकाराच्या धोरणाबद्दल स्पष्ट मत मांडले. 

सहकार विभागाच्या विभागीय बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. सध्या नाशिक जिल्हा बॅंकेची केवळ 5 टक्के कर्जवसुली झाल्यामुळे बॅंक अडचणीत सापडली आहे. तसेच नाशिक बाजार समितीमधील अनियमिततेविषयीही अनेक तक्रारी आहेत. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी मते मांडली. 

देशमुख म्हणाले, "सहकारातील काही चुकीचे पायंडे रद्द करून त्यात दुरुस्ती करून सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अधिकाधिक हित साधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक गावातील विविध कार्यकारी संस्थांना त्यांच्याच गावात नवीन उद्योग, व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक मदत देण्यास तयार आहे. या संस्थांनी गावातच प्रक्रिया वा इतर उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्याबरोबरच गावातील किमान दहा जणांना रोजगार उपलब्ध होऊन शहराकडे होणारे स्थलांतर टाळण्यास मदत होणार असल्याचा त्यांनी दावा केला.

Web Title: Farmers will not be created paying their credit debt