धुळे जिल्‍हात चार लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे लक्ष्यांक !

यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे
धुळे जिल्‍हात चार लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे लक्ष्यांक !



सोनगीर ः धुळे जिल्ह्यात आगामी खरीप हंगामात (Kharif season) चार लाख चार हजार आठशे हेक्टर ( Hector) क्षेत्रात पेरणीचे लक्ष्यांक असून त्यासाठी महाबीज (Mahabeej) व खासगी क्षेत्रातील कंपनीकडून ३२ हजार ७४४ क्विंटल बियाण्यांची (seeds) मागणी करण्यात आली आहे. यंदा सर्वाधिक क्षेत्रात कापसाची लावणी होणार असल्याची संभावना असून गेल्या वर्षांप्रमाणे यंदाही सूर्यफुलाची (Sunflower) लावणी होणार नाही असा अंदाज आहे. विहिरीत बऱ्यापैकी पाणी असल्याने बागायतदार शेतकऱ्यांनी (farmer) कापसाच्या (cottan) लावणीला सुरुवात केली आहे.

(dhule district Kharif season fore lakh Hector Sowing farmer target)

धुळे जिल्‍हात चार लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे लक्ष्यांक !
आता..रोबोटही करणार शेतीची कामे !

कृषी विभागातर्फे बियाण्यांची मागणी केली असून महाबीज व खासगी क्षेत्रातील कंपन्या बियाणांचा पुरवठा करणार आहेत. त्यांपैकी २७२०९ क्विंटल बियाणे खासगी कंपनीकडून तर ५५३५ क्विंटल बियाणे महाबीज कंपनीकडून घेण्यात येणार आहे. तशी मागणी झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने शेतकऱ्यांत समाधान असून उत्साहाने बियाणे खरेदी केली जात आहे.

यंदा केवळ ४०० हेक्टरवर पेरणी

दरवर्षी प्रमाणे तीळाच्या क्षेत्रात घट होत असून यंदा केवळ ४०० हेक्टरवर पेरणी अपेक्षित असून ११ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. नागली पेरणीचे प्रमाणही कमी असून यंदा १४०० हेक्टर क्षेत्रात पेरणी व ३५ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. जिल्ह्यात कापूस, मका, बाजरी, सोयाबीन, मूग, भुईमूग आदी खरिपातील महत्त्वाची पिके असून मोठ्याप्रमाणात पेरणी अपेक्षित आहे. संकरित बिटीयुक्त कापूस लावणीसाठी नऊ लाख ५१ हजार ५७५ पाकिटे मागविण्यात आले असून त्यांपैकी महाबीज ४१५७९ पाकिटे व ९०३९९६ पाकिटे खासगी कंपनीकडे मागणी केली आहे.

धुळे जिल्‍हात चार लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे लक्ष्यांक !
झाडाखाली आंबे वेचणाऱ्या बालकाचा अंगावर फांदी पडून मृत्यू !

धुळे जिल्ह्यात पेरणीचे व बियाणांचे लक्ष्यांक

पिके………. क्षेत्र हेक्टरमध्ये ……….. बियाणे क्विंटलमध्ये
संकरित ज्वारी ८७३० ८७३
सुधारित ज्वारी ९७० ९७
संकरित बाजरी ५१७५० १५५३
सुधारित बाजरी ५७५० १७३
भात ४५०० २१६०
नागली १४०० ३५
भुईमूग १०४०० ६२४०
सोयाबीन १४२०० १४७३
तीळ ४०० ११
तूर ६४०० ६७२
मूग १२६०० १७०१
उडीद ४५०० ६०८
मका ५९३०० ११८६०
सुधारित कापूस ३३५८५ १००८
संकरित कापूस १९०३१५ ४२८२
______________________________________
एकूण. ४०४८०० ३२७४४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com