भारतीय संस्कृतीच्या ओळखीसाठी फॅशन शो 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

नाशिक : आजच्या नवीन पिढीला भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी, तसेच आपली वस्त्रपरंपरा टिकून राहावी, यासाठी "नक्षत्र'तर्फे गंगापूर रोडवरील गुप्ता गार्डनमध्ये रविवारी (ता. 17) फॅशन शो झाला. फॅशन शोमध्ये सहभागी झालेल्या विविध कलाकारांनी वासुदेव, बाजीराव, मल्हार, राजस्थानी, बंगाली, विठोबा, शेतकरी असे धोतीचे विविध प्रकार, तर ब्राह्मणी, मराठमोळी, मस्तानी, कोल्हापुरी यांसारखे नऊवारीचे विविध प्रकार परिधान करून रॅम्पवॉक केला. 

फॅशन शोमध्ये धोतीचे वीस व नऊवारीचे सत्तावीस प्रकार सादर करण्यात आले. धोती प्रकारामध्ये वासुदेव, बाजीराव, मल्हार, राजस्थानी, बंगाली, परशुराम, इंडो-वेस्टर्न, विठोबा, एकटांगी, शेतकरी असे पेहराव करून सादर करण्यात आले. नऊवारीत कोल्हापुरी, मेनका, इंद्रायणी, देवयानी, स्वरांजली, कादंबरी, शाही मस्तानी, शाही ब्राह्मणी, मराठमोळी असे प्रकार सादर करण्यात आले. धोती आणि नऊवारीमध्ये सादर केलेल्या विविध वेशभूषांमधून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत होते. संयोजक गणेश तुम्मा, अनुराधा तुम्मा, डॉ. संगीता पेठकर, लता करे, कल्पना परदेशी आदी उपस्थित होते. 

Web Title: Fashion show for the recognition of Indian culture