नवरात्रीनिमित्त खास उपवासांच्या पदार्थांची रेलचेल...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

नवरात्रोत्सवात बाजारात  वेगवेगळ्या प्रकारचे उपवासाचे पदार्थ दाखल झाले आहेत. घरा-घरात अनेक प्रकारच्या उपवासांच्या पदार्थांनी जिभेचे चोचले पूर्ण केले जात आहे. शहरातील खास उपवासाचे पदार्थं मिळण्याचे काही ठिकाण प्रसिद्ध आहेत. सांयताराचा वडा, बटाटा कचोरी आणि बुधाची प्रसिध्द बटाट्याची जिलेबी या पदार्थांची नावे अग्रस्थानी आहेत. उपवासाच्या पदार्थांनी बाजारपेठा सजल्या आहेत.

नाशिक : नवरात्रीनिमित्त आदिशक्तीचा उत्सव चांगलाच रंगात आला आहे. नवरात्रोत्सवात महिलांसह पुरूष भाविकदेखील उपवास करत असतात. त्यामुळे बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपवासाचे पदार्थ दाखल झाले आहेत. घरा-घरात अनेक प्रकारच्या उपवासांच्या पदार्थांनी जिभेचे चोचले पूर्ण केले जात आहे. यासोबतच शहरातील खास उपवासाचे पदार्थं मिळण्याचे काही ठिकाण प्रसिद्ध आहेत. सांयताराचा वडा, बटाटा कचोरी आणि बुधाची प्रसिध्द बटाट्याची जिलेबी या पदार्थांची नावे अग्रस्थानी आहेत. उपवासाच्या पदार्थांनी बाजारपेठा सजल्या आहेत.

उपलब्ध करून देण्याची जणू स्पर्धाच​

थालीपीठ, केळीची भाकरी, साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, पॅटिस, उपवासाचे बिस्किट, शिंगाडा पीठ, राजगिरा पीठ, केळीचे पीठ, वेफर्स, चिवडा, सुखामेवा, गुलाबजाम, खोबऱ्याचे लाडू, बर्फी पांरपारिक पदार्थासोबतच नविन पदार्थ बाजारात उपलब्ध झाले आहेत. महिलाच नव्हे तर पुरूषही मोठ्या प्रमाणावर नवरात्रीचे उपवास, व्रत, वैकल्ये करीत असल्याने यावर्षी हॉटेल व्यावसायिक तसेच खाद्यपदार्थांच्या दुकानदारांनी या दिवसांत वेगवेगळे पदार्थ उपलब्ध करून देण्याची जणू स्पर्धाच सुरू केलेली दिसून येत आहे. यावर्षी उपवासासाठी भगरीचे बिस्किट, भगरीची चटणी, थालीपीठ, राजगिऱ्याची नानकटाई अशा अनेक पदार्थांनी नऊ दिवसांची पोटाची भूक भागवणार आहे. 

अश्‍या आहेत किंमती 
शिंगाडा पीठ----------- 85 रूपये दोनशे ग्रॅम 
भगर पीठ-------------50रूपये दोनशे ग्रॅम 
केळीचे पीठ----------200 रूपये किलो 
राजगिरा पीठ----------50 रूपये दोनशे ग्रॅम 
साबुदाणा पीठ--------50रूपये दोनशे ग्रॅम 
भगरीचे बिस्कीट-------250रूपये किलो 
फराळी चिवडा-------200रूपये किलो 
मलई बर्फी---------500 रूपये किलो 
केशरी पेढा--------480रूपये किलो 
काजू कतली-------1000रूपये किलो 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fast food available in nashik market