रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी उपसभापती भागवतांचे रस्त्यावरच उपोषण

bhagwat
bhagwat

येवला - गवंडगांव परिसरातील देवठाण, देवळाणे, गारखेडे, तळवाडे शिवरस्ता, तळवडे रेलवे गेट पर्यंत जाणाऱ्या सर्व रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. याकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी लक्ष देत नसल्याने पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यांनी आजपासून (ता.२६) गवंडगाव येथे देवठाण रस्त्यावर ग्रामस्थासह आमरण उपोषण सुरु केले आहे.

गवंडगांव परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, हे रस्ते सातत्याने दुर्लक्षित राहिलेले आहेत. या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. चारही रस्त्यांच्या आजूबाजूला मोठी लोकवस्ती असून सर्वांनाच हाल सहन करावी लागत आहे. रस्ते डांबरीकरणाच्या मागणीसाठी जिल्हा नियोजन मंडळांसह आमदार छगन भुजबळ यांनाही पत्र दिलेले आहे. तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालय नाशिक यांना पत्र दिलेले आहे. मात्र आजपर्यंत दखल न झाल्याने उपोषण केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गवंडगांव, गारखेडे, देवठाण, तळवाडे, देवळाणे, पांजरवाडी येथील ग्रामस्थ उपोषणास उपस्थित होते. तसेच गवंडगांव येथील जनता विद्यालय व जिल्हा परिषद शाळेत उद्यापासून विद्यार्थ्यांना न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. उपोषणास माजी सभापती संभाजीराजे पवार, सभापती नम्रता जगताप, रतन बोरनारे, प्रविण गायकवाड, संजय पगारे, दिलीप मेंगाळ, शरद लहरे, भागवत सोनवणे, कांतीलाल साळवे, विठ्ठल आठसेरे, दिपक जगताप, गारखेडे सरपंच वसंत खैरनार, देवळाणे सरपंच महेंद्र जाधव, गणपत खैरनार, वसंत पवार, गोरख उशीर, राजेंद्र जाधव, सागर गायकवाड, रमेश देवरे, दिनेश पागीरे, कैलास आरखडे, वाल्मिक गुडघे, नानासाहेब खैरनार, बापूसाहेब शेलार, देविदास जानराव, गणपत उशीर, बाळासाहेब गोसावी आदींनी सहभाग घेतला.

तहसीलदार नरेशकुमार बहिरम, गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांनी भेट देऊन चर्चा केली मात्र ठोस कृती होईपर्यत उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा भागवत व ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान आज आमदार भुजबळ गवंडगांव ग्रामपंचायत कार्यालयाचे इमारतीच्या उद्घाटणासाठी येथे आले होते. हाकेच्या अंतरावर उपोषण चालू आसताना भुजबळ उद्घाटन करून चौकशी न करताच निघून गेले. यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com