जळगावमध्ये अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

जळगाव - भरधाव वाहनाची मोटारसायकलला जोरदार धडक बसून झालेल्या अपघाताच पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. पुढील आठवड्यात मुलीचे लग्न असल्याने लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी वडील नामदेव वाडीले व मुलगा राकेश वाडीले यांच्यासह आणखी एक जण असे तिघे जण मोटारसायकलवरून जात असताना चाळीसगाव-धुळे मार्गावरील दहिवद- खडकेसिमदरम्यान भरधाव वाहनाची धडक त्यांच्या गाडीला बसली. यात वाडीले पिता-पुत्रांचा जागीच मृत्यू झाला, अन्य एक जण जखमी झाला. त्यास धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Web Title: father son death in accident