फेब्रुवारी एंडिंगला पारा 36 अंशांवर! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

जळगाव - हिवाळ्यात थंडीमुळे जळगावकर गारठले होते. परंतु थंडी आता तुलनेत अतिशय कमी झाली असून, किमान तापमान वाढण्यास सुरवात झाली आहे. फेब्रुवारी अद्याप संपायचा असतानाच कमाल तापमान आज 36 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. मात्र, रात्री आणि पहाटेच्या हवेत गारवा जाणवत आहे. 

जळगाव - हिवाळ्यात थंडीमुळे जळगावकर गारठले होते. परंतु थंडी आता तुलनेत अतिशय कमी झाली असून, किमान तापमान वाढण्यास सुरवात झाली आहे. फेब्रुवारी अद्याप संपायचा असतानाच कमाल तापमान आज 36 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. मात्र, रात्री आणि पहाटेच्या हवेत गारवा जाणवत आहे. 

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तापमानात काही अंशांची वाढ झाली होती. त्यावेळी दुपारी उन्हाचे चटके जाणवू लागले होते. मात्र, मध्यंतरी पुन्हा हवेत गारवा निर्माण झाल्याने थंडी पुन्हा परतते की काय, असा अनुभव येत होता. मात्र, आठवडाभरापासून पुन्हा तापमान वाढल्याने शनिवारपासून (18 फेब्रुवारी) तापमानात वाढ झाली आणि दुपारी उन्हाचे चटके जाणवू लागले. ही वाढ दिवसागणिक सुरूच असून, आज ममुराबाद येथील हवामान विभागात कमाल तापमान 36, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. 

दहा दिवसांत आठ अंशांनी वाढ 
जळगावचे तापमान मार्च एंडिंगलाच चाळीशीवर पोहोचते. त्यामुळे अंगाची लाही-लाही करणारे तापमान आता हळूहळू वाढू लागले आहे. साधारण दहा-बारा दिवसांपूर्वी कमाल तापमान 30 सेल्सिअसपर्यंत होते. मात्र, मागील दहा दिवसांत तापमान आठ अंशांनी वाढून 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. तर मागील तीन-चार दिवसांतच तापमान चार अंशांनी वाढले. सध्या तापमानात रोज वाढ होत असल्याने मार्चच्या पहिल्या आठवड्यातच पारा चाळीशीवर पोहोचण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

मागील सहा दिवसांचे तापमान 

तारीख.......... कमाल तापमान 
16 फेब्रुवारी....34.0 सेल्सिअस 
17 फेब्रुवारी... 34.4 सेल्सिअस 
18 फेब्रुवारी... 35.0 सेल्सिअस 
19 फेब्रुवारी... 35.5 सेल्सिअस 
20 फेब्रुवारी... 37.0 सेल्सिअस 
21 फेब्रुवारी... 36.0 सेल्सिअस 

Web Title: February Ending 36 degrees Celsius temp