ब्लॅकमेलिंगला कंटाळूनच महिलेने मृत्यूला कवटाळले

५० हजारांसाठी छळवणूक करणाऱ्या प्रियकरास अटक
Women sucide
Women sucideSakal

जळगाव - शहरातील जोशीपेठ भावसार मढीसमोर वास्तव्यास असलेल्या चाळीस वर्षीय विवाहितेने ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्त्या केल्याची घटना घडली. गल्लीतील भामट्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून फिरदोस बी या विवाहितेला पन्नास हजारांची मागणी केली होती. पैसे नाही दिल्यास समाजात बदनामीची धमकी दिल्याने अखेर विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत मृत्यूला कवटाळले. शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयितास अटक करण्यात आली आहे.

जोशीपेठ परिसरात जुबेर अब्दुल करीम खाटीक (वय ४५) पत्नी फिरदेासबी आणि दोन मुलं जैद आणि उमेर यांच्यासह वास्तव्यास असून कपडे विक्रीचा व्यवसाय करुन उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी (ता. ८) घटनेच्या दिवशी जुबेर खाटीक शाळेतून लहान मुलास घेउन घरी पोहचले. तर, घरात पत्नी फिरदोसबी हिने गळफास घेतल्याचे आढळून आले. तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीअंती मयत घोषीत केले. शनिपेठ पोलिसांत आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

...अन्‌ कबरीवर येऊन गेला

फिरदोसबी हिच्या अंत्यविधीनंतर तिसऱ्या दिवशी जुबेर खाटीक मुलगा जैद व उमेर यांच्यासह कब्रस्थानात प्रार्थनेसाठी आणि विटा लावण्यासाठी आले. त्यांना अगोदरच कुणीतरी येउन गेल्याचे आढळून आले. त्यांनी चौकशी केली असता आदील ऊर्फ नट्टू अल्ताफ खाटीक याने मयत व्यक्ती माझी पत्नी असल्याचे सांगत कबरवर विटा लावल्याचे सांगण्यात आले. घडल्या प्रकारानंतर जुबेर यांनी तत्काळ समाजातील शाकिर खाटीक, सलीम खाटीक, शेख परवेझ, आबीद शेख, शाबीर भाई अशांना बोलावून घडला प्रकार सांगितल्याने आर्दील ऊर्फ नट्टू खाटीक याला बोलावून समाजातील वरिष्ठांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

मोबाईल चॅटींगने फुटले बिंग

मंगळवारी (ता. १२) दुपारी मुस्लीम कब्रस्थानात खाटीक समुदायाची बैठक बोलावण्यात आली. बैठकीत आदील ऊर्फ नट्टू खाटीक याने आपले फिरदेासबी सोबत ५ ते ६ महिन्यांपासून संबंध असल्याचे कबुल केले. बिरादरीच्या लोकांनी तत्काळ त्याच्या जवळील दोन्ही मोबाईल तपासून बघितले असता त्याने फिरदोसबी हिला तिच्या मुलाच्या मोबाईलवर चॅटींग केल्याचे आढळून आल्याने आदीलचे बिंग फुटले.

...पन्नास हजारांची मागणी

इकडे आदील ऊर्फ नट्टूच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि चॅटींगमधून दोघांचे संबंध असल्याचे व तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे फिरदेासबी ही पती जुबेर खाटीक यांना २-३ महिन्यांपासून पन्नास हजारांची मागणी करत होती. मात्र, पैसे नसल्याचे त्यांनी सांगितले हेाते. आदीलकडून विवाहितेच्या बदनामीची धमकी दिल्यानेच तिने गळफास घेत मृत्यूला कवटाळल्याचे निष्कर्षांवरून फिर्यादी जुबेर खाटीक यांनी तक्रार दिल्याने आदिल ऊर्फ नट्टू अल्ताफ खाटीक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होउन अटक करण्यात आली आहे. तपास सहाय्यक फौजदार किरण पाठक करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com