अवैध गर्भलिंगचाचणी, स्त्री भ्रूणहत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा : ऍड. देशपांडे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

नाशिक - नाशिक रोड कारागृहातील डॉ. बळिराम शिंदे याचा मृत्यू व त्यातील डॉ. सुदाम मुंडे याच्या कथित सहभागाच्या प्रकरणात तुरुंग प्रशासनाने एकतर ढिलाई दाखविली असावी किंवा अशा रीतीने गंभीर गुन्ह्यांमधील कैद्यांच्या जीविताविषयी मुंडेसोबत हातमिळवणी असावी, असा आरोप लेक लाडकी अभियानाच्या ऍड. वर्षा देशपांडे यांनी शनिवारी केला. अवैध गर्भलिंगचाचणी व स्त्री भ्रूणहत्यांशी संबंधित सगळ्याच मृत्यूंची सीबीआय अथवा न्यायालयीन चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. 

राज्याच्या अनेक भागांत मुलींचे जीव गर्भातच संपविण्याचा जो गोरखधंदा सुरू होता, त्यात मुंडेसाबत डॉ. कोल्हे व इतरही अनेक महाभाग सहभागी होते. मुंडेचा मेहुणा डॉ. अंगद केंद्रे हाच त्याचा हा धंदा सांभाळायचा. मुंडे दाम्पत्य फरार असताना, कुत्र्यांना गर्भ खाऊ घालण्याच्या संशयावरून पोलिसांनी अंगद केंद्रे याच्या शेतातल्या घराची झडती घेतली होती. 18 जूनला त्याला अटक झाली. 24 जुलै 2012 ला अंबाजोगाई न्यायालयातून जामिनावर सुटल्याच्या दिवशीच परळीजवळ नंदागौळ शिवारात त्याने विष प्राशनाने आत्महत्या केली. परळीला सरस्वती व सुदाम मुंडे या दाम्पत्याच्या मुसक्‍या आवळल्यानंतर बीड-जळगाव कनेक्‍शन उजेडात आले होते. अंबाजोगाईच्या तत्कालीन पोलिस उपअधीक्षक स्वाती भोर यांच्या पथकाने जळगावात राहुल कोल्हे याच्या पद्मावती हॉस्पिटलची झडती घेतली व त्यात मराठवाड्यातील गरोदर माता गर्भलिंगनिदान व गर्भपातासाठी जळगावला पाठविण्यात येत होत्या, असे उजेडात आले. त्यानंतर कोल्हेला सहआरोपी करण्यात आले.

Web Title: female feticide case CBI probes illegal pregnancy test says Adv Deshpande