"नंदिनीबाई'च्या विद्यार्थिनींचा महिला कैद्यांशी संवाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

जळगाव - येथील नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनींनी शैक्षणिक प्रकल्पाला अनुसरून आज जळगाव जिल्हा कारागृहातील महिला कैद्यांशी मुक्तपणे संवाद साधला. महिला कैद्यांनी गुन्हा का केला? त्यांची कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व मानसिक परिस्थितीची पार्श्‍वभूमी, समाजातील लोकांबद्दल महिला कैद्यांची मते, महिला कैद्यांच्या कल्याणासाठी अमलात आणल्या जाणाऱ्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी, कारागृहातून बाहेर पडल्यानंतर इतर महिलांना द्यावयाचा सल्ला आदी विविध विषयांवर विद्यार्थिनींनी संबंधित महिला कैद्यांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी संवेदनशील अशा "उत्तर महाराष्ट्रातील आरोपींत महिला कैद्यांचा अभ्यास' या विषयावर पीएच. डी. पदवी मिळाल्याबद्दल प्रा. डी. यू. राठोड यांचा कारागृह अधीक्षक डी. टी. डाबेराव यांनी बुके देऊन सत्कार केला. याप्रसंगी प्रा. राठोड यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी बंदी हा माणूस असून, त्यालाही जीवन जगण्याचा अधिकार आहे. महिला कैद्यांनी कारागृहातील सुटकेनंतर एक आदर्श माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व कारागृह अधीक्षक डाबेराव यांनी कायद्यातील बारकावे समाजावून सांगत त्यांच्या पालनाचे महत्त्व सांगितले. डिंपल पवारने सूत्रसंचालन केले. प्रा. प्रदीप बारी यांनी आभार मानले.

Web Title: female inmates to communicate with the students