बोलता..बोलता..'ते' तुमचा मोबाईल घेऊन फरार होतात...

railway thives.jpg
railway thives.jpg

नाशिक : विदर्भ एक्‍स्प्रेसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरीप्रकरणी रेल्वे पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. सिन्नर फाटा येथील संशयित महिलेकडून मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. रेल्वेत महिलांकडून चोरीच्या प्रमाणातही वाढ होत आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने योग्य ते नियोजन केले पाहिजे. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 मोबाईल चोरीप्रकरणी महिला गजाआड 

राहुल विजय अंबरसकर (वय 31, डॉ. आंबेडकर सदन, एसबी पवार मार्ग, करी रोड, मुंबई) 22 नोव्हेंबरला डाऊन विदर्भ एक्‍स्प्रेसने मुंबई ते वर्धा असा प्रवास करत असताना त्यांचा 25 हजाराचा विवो कंपनीचा मोबाईल चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी अंबरसकर यांच्या तक्रारीवरून डाऊन विदर्भ एक्‍स्प्रेसचे टीसीकडे टीटी फॉर्मवर तक्रार दिल्याने त्यावरून भुसावळ रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन 27 नोव्हेंबरला हा गुन्हा नाशिक रोड रेल्वे पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी सोमवारी (ता. 2) रेल्वे पोलिसांनी प्लॅटफॉर्म क्रमांक चारच्या रेल्वे पुलाखाली संशयित महिलेजवळ या गुन्ह्यातील मोबाईल शोधून काढला

रेल्वे पोलिस ठाण्याचे हवालदार संतोष दत्तात्रेय उफाडे, पोलिस शिपाई महेश सावंत, आरपीएफ कैलास बोडके व महिला पोलिस शिपाई सुजाता यांच्या पथकाने रेल्वे पोलिस ठाण्यात संशयित महिलेची चौकशी करत विवो कंपनीचा मोबाईल हस्तगत केला. याप्रकरणी संशयित महिला आरोपी मुमताज रियाज मेमन (वय 28, स्टेशन वाडी, विष्णूनगर, नाशिक रोड) या महिलेला अटक करण्यात आली असून, नाशिक रोड रेल्वे पोलिस ठाणेचे अशोक रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राजेंद्र बोराळे तपास करीत आहेत.

रेल्वेचा प्रवास दिवसेंदिवस कठीण
प्रवाशांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा, ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र गेल्या काही वर्षात रेल्वे हद्दीतील गुन्हेगारी वाढत असून याला संबंधित यंत्रणाच जबाबदार आहे, असा आरोप प्रवाश्यांकडून केला जात आहे. विशेष करून महिला प्रवाशांच्या सुरक्षेकडे अधिक भर दिला पाहिजे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने योग्य ते नियोजन केले पाहिजे. यातच आता काही महिला  चोर  महिला रेल्वेत अत्यंत साध्या वेशात येऊन बोलण्यात गुंगवून ठेवत मोबाईल चोरी करतात. यांसारख्या प्रकारामुळे रेल्वेचा प्रवास दिवसेंदिवस कठीण होत चालला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com