मनमाड: चोरलेल्या पैशांवरुन वादावादीत गोळीबार, एक जखमी

अमोल खरे 
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

मनमाड - चोरलेल्या पैशांच्या वाटपावरुन झालेल्या मारहाणीत आणि गोळीबारात एक जण जखमी झाला असून, जखमी चोरट्यासह त्याच्या दोन साथिदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मनमाड - चोरलेल्या पैशांच्या वाटपावरुन झालेल्या मारहाणीत आणि गोळीबारात एक जण जखमी झाला असून, जखमी चोरट्यासह त्याच्या दोन साथिदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

धुळे येथील मालेगाव रोडवर असलेल्या विठ्ठल दिगंबर गवळी यांच्या न्यू प्रतीक दूध डेअरीवर पल्सरवर आलेल्या सागर मरसाळे, विनोद मरसाळे आणि गुरू भालेराव या तिघांनी हातातील पिस्टल रोखून धाक दाखवत १५ हजार रुपयांची  चोरी केली. त्यानंतर तडक मनमाड गाठत सागर राहत असलेल्या भगतसिंग मैदान येथील घरी आले. तेथे पैशांच्या वाटापावरुन दारुच्या नशेत असलेल्या तिघांमध्ये वाद झाले. या वादावादीत जवळ असलेले पिस्टल काढून विनोदने गुरुकडे रोखले आणि गाळी झाडली. ही गोळी गुरुच्या पायावा लागली. जखमी झालेल्या साथिदाराला पाहून या तिघांची नशा उतरली. चाकू गरम करुन त्यांनी गोळी काढण्याची प्रयत्न केला. परंतु, तो असफल ठरला. गुरुला दवाखान्यात न्यायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पोलिसांना फोन केल्यास तिघेही पकडले जातिल त्यामुळे जखमी गुरुने पोलिसांना फोन करायचा व इतर दोघांनी पळून जायचे असे त्यांनी ठरवले. त्याप्रमाणे साथिदारांनी गोळी मारल्याने जखमी झालो असल्याचा फोन गुरुने पोलिसांना केला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी सागर आणि विनोद पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र पोलिसांनी त्यांना पकडण्यात यश आले. गुरुला देखील पोलिसांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर धुळे पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी चोरट्यांना ताब्यात घेतले. 

भरवस्तीत गोळी झाडल्याच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची गंभीरता ओळखून जिल्हा ग्रामिण पोलिस अधीक्षक संजय दराडे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस उपअधीक्षक राघसुधा आर, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट आदींनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरु केला. दे तिघेही सराईत गुन्हेगार असून, सागर याच्यावर जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरील पोलिस ठाण्यामध्ये तसेच विविध रेल्वे पोलिस ठाण्यात त्याच्या विरुद्ध विविध प्रकारचे सुमारे २७ गंभीर गुन्हे दाखल आहे. इतर दोघांवरही अनेक गुन्हे दाखल आहेत. सागर यांच्याकडून चोरीतील ९८५० रुपये, गुन्ह्यात वापरलेले दोन पिस्तुलं, पल्सर व पॅशन आशा दोन मोटार सायकल असा १,१९,८५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल धुळे पोलिसांनी जप्त केला आहे.

Web Title: fight with stolen money, one injured