विवाहितेचा खून; सासरच्या मंडळीवर खून, जादूटोणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 3 जुलै 2018

तिला कन्यारत्न जन्माला आले. तेव्हापासून तिला त्रास देणे सुरू केले. एवढेच नाही तर तुला मुलगा होत नाही असे म्हणून भंडावून सोडत असत. नांदायचे असेल तर माहेराहून ॲटो व सेंट्रींगचे सामान खरेदी करण्यासाठी पैशाची मगाणी करून तिचा शारिरीक व मानसिक छळ करू लागले.

नांदेड - हदगाव तालुक्यातील कोपरा येथील एका भोंदुबाबाच्या सांगण्यावरून विवाहितेचा खून करून फासावर लटकविले. याप्रकरणी पतीसह त्याच्या घरच्या मंडळीवर खून व जादूटोणा कायद्यानुसार तामसा ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पतीला अटक केली असून दोन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.

हदगाव तालुक्यातील कोपरा येथे राहणारी फरहानबी नजीरखान पठाण (वय २६) हिला लग्नानंतर सासरी काही दिवस चांगले नांदवले. दरम्यानच्या काळात तिला कन्यारत्न जन्माला आले. तेव्हापासून तिला त्रास देणे सुरू केले. एवढेच नाही तर तुला मुलगा होत नाही असे म्हणून भंडावून सोडत असत. नांदायचे असेल तर माहेराहून ॲटो व सेंट्रींगचे सामान खरेदी करण्यासाठी पैशाची मगाणी करून तिचा शारिरीक व मानसिक छळ करू लागले. हा प्रकार तिने आपल्या माहेरी सांगितला. परंतु एवढे पैसे आणायचे कुठून असा प्रश्‍न तिच्या माहेरी पडला. तसेच मुलगा होण्यासाठी कोपरा येथे असलेल्या एका भोंदुबाबाकडे तिला नेऊन तिच्यावरून लिंबु व गंडेदोरे करत होते. हे की तिला हे मान्य नव्हते. अखेर तिला पती व त्याच्या अन्य नातेवाईकांनी संगनमत करून २९ जून रोजी बेदम मारहाण करून तिचा खून केला. आणि त्यानंतर तिला गळफास दिला. मयत विवाहितेचा भाऊ सय्यद लतीफ सय्यद पीर यांच्या फिर्यादीवरुन तामसा पोलिस ठाण्यात नजीरखान पठाण, महेमुदखान पठाण, मुस्तारूखान पठाण, शहीदखान पठाण, सोजोबी पठाण, शाहेराबी मोहमदखान पठाण, शाहरुखखान पठाण यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी पती नजीरखान पठआम याला अटक केली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील माने हे करीत आहेत.    
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Filed the complaint against in laws for killed their daughter in law