कोटा भरून काढण्यासाठी बचत खाते "जन-धन'मध्ये!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

शहादा - अनेक वर्षांपासून असलेले बचत खाते अचानक जन- धन योजनेत वर्ग करण्याचा प्रकार स्टेट बॅंकेपाठोपाठ "बॅंक ऑफ महाराष्ट्र'मध्येही उघड झाला आहे. पर्यायाने या ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येत नसल्याचे दिसून आले आहे. जन-धन योजनेत पंतप्रधान कार्यालयाकडून बॅंकांना कोटा निश्‍चित करण्यात आला आहे, तो पूर्ण करण्यासाठी हा उद्योग बॅंकेचे अधिकारी करीत असल्याचे दिसून येत आहे.

शहादा - अनेक वर्षांपासून असलेले बचत खाते अचानक जन- धन योजनेत वर्ग करण्याचा प्रकार स्टेट बॅंकेपाठोपाठ "बॅंक ऑफ महाराष्ट्र'मध्येही उघड झाला आहे. पर्यायाने या ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येत नसल्याचे दिसून आले आहे. जन-धन योजनेत पंतप्रधान कार्यालयाकडून बॅंकांना कोटा निश्‍चित करण्यात आला आहे, तो पूर्ण करण्यासाठी हा उद्योग बॅंकेचे अधिकारी करीत असल्याचे दिसून येत आहे.

स्टेट बॅंकेच्या येथील शाखेत पगारदार व निवृत्तिवेतनधारक, ज्येष्ठ नागरिकांचे अनेक वर्षांपासून बचत खाते आहेत. ते रात्रीतून "जन-धन'मध्ये वर्ग करण्यात आले, ही बाब "सकाळ'ने उघड केली. ग्राहकांनी याबाबत बॅंकेत तपास केला असता, अनेकांची खाती "जन-धन'मध्ये वर्ग झाल्याचे दिसून आले. असे का झाले, याबाबत खातेदारांनी विचारपूस केली असता त्यांचे समाधान अधिकारी व कर्मचारी करू शकले नाहीत.

"जन-धन'मध्ये वर्ग का केले?
असाच प्रकार बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत झाला आहे. एका महिलेचे तीन वर्षांपासून या बॅंकेत बचत खाते आहे. सुमारे 20 हजारांपेक्षा अधिक रक्कम जमा आहे. ही महिला बॅंकेत गेली असता, तिचे खाते "जन-धन'ला वर्ग झाल्याचे दिसून आले. "तुमची "केवायसी' अपूर्ण आहे, तुम्हाला केवळ पाच हजार रुपये काढता येतील,' असे सांगण्यात आले. तसेच आपण बॅंकेला कोणत्याही प्रकारे सूचना दिली नसताना असे खाते परस्पर का वर्ग केले, असे विचारले असता अधिकारी उत्तर देऊ शकले नाहीत.

बॅंक अधिकाऱ्यांची चूक
बचत खाते जन-धन योजनेत का बदलण्यात येत आहेत, याबाबत माहिती घेतली असता धक्कादायक माहिती पुढे येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जन-धन योजना सुरू केली. ती नागरिकांसाठी खुली केली. त्यावेळी देशातील सर्व बॅंकांनी शिबिर घेऊन खाते उघडावे, असे सुचविले होते. त्यासाठी कोटाही निश्‍चित केला होता. ही बाब अनेक शाखाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली नाही. त्यातच नोटाबंदीचा निर्णय घोषित झाला. चलनातून बाद नोटा जमा करण्यास बॅंकेत गर्दी होऊ लागली. या गर्दीचा लाभ घेत काही बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी अनेक वर्षांपासून असलेली खाती "जन-धन'मध्ये वर्ग करणे सुरू केले. बॅंक अधिकाऱ्यांची चूक असताना भुर्दंड ग्राहकांना होत आहे. याबाबत सर्वंकष चौकशी करून पुन्हा बचत खात्यात वर्ग करण्याचे आव्हान आहे.

बॅंक ऑफ महाराष्ट्रची शहादा येथे शाखा सुरू झाली, तेव्हापासून माझे व पतीचे स्वतंत्र बचत खाते आहे. त्यावर नियमित व्यवहार सुरू आहेत. खात्यावर वीस हजारांपेक्षा अधिक रक्कम आहे. त्यातील काही पैसे काढण्यासाठी मी बॅंकेत गेली होती. त्यावेळी बॅंक कर्मचाऱ्यांनी माझे खाते "जन-धन'मध्ये वर्ग झाले आहे, असे सांगितल्याने भोवळच आली.
- अलका घोडराज, गृहिणी, शहादा

Web Title: To fill the quota savings account in jan-dhan