श्रमदानाने खड्डे बुजविण्याची गांधीगिरी!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

अनेक वेळा तक्रारी, आंदोलने छेडूनही सार्वजनिक बांधकाम विभाग पुर्णपणे डोळेझाक करत असल्याने वैतरणा-घोटीच्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम श्रमजीवी संघटनेतर्फे करण्यात आले. या वेळी श्रमदान करून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम करत अनोख्या पध्दतीने गांधी जयंती साजरी करुन सरकारचा निषेध व्यक्त केला.

नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गासह तालुक्यातील सर्वच रस्त्यांना घरघर लागली असुन घोटी- सिन्नर रस्त्याची तर पूर्ण चाळण झाली आहे.अनेक वेळा तक्रारी, आंदोलने छेडूनही सार्वजनिक बांधकाम विभाग पुर्णपणे डोळेझाक करत असल्याने वैतरणा-घोटीच्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम श्रमजीवी संघटनेतर्फे, श्रमदान करून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम केले.यानेळी अनोखी गांधी जयंती साजरी करुन सरकारचा निषेध व्यक्त केला.
 

महिना उलटूनही काम नाही

वैतरणा-घोटी रास्ता दुरुस्तीसाठी अनेकवेळा संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली होती. यावेळी रास्ता रोको करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर लगेचच रस्ता दुरुस्तीसाठी २ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मात्र एक महिना झाला कोणत्याही प्रकारचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले नाही. त्यामुळे शासनाचा निषेध कारणासाठी व वाहन धारकांचा तसेच प्रवाशांना होणारा त्रास कमी व्हावा. या उद्देशाने बुधवारी ( ता.२ ) गांधी जयंती निमित्त श्रमजीवी संघटनेच्या वतीने श्रमदान करून रस्त्यावर पडलेले खडे बुजविण्याचे काम करण्यात आले.

यावेळी संघटनेचे संजय वारघडे, पूना पुंजारे, गोटीराम तेलम, विजय लाखन, काळू भस्मे, शांताराम पादिर, भोरू पुंजरे, संतोष पादिर, भाऊसाहेब शेंडे, बाबुराव बांहरे, भगवान डोखे, लखन डोखे, बाळू मधे, सुरेश पुंजारे ,भगवान मधे आदींनी सहभाग घेतला.

 प्रतिक्रिया 

वैतरणा ते घोटी रस्त्यावर खुप खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला आंदोलनाचा इशारा दिल्यानतंर त्यांनी रस्ता दुरुस्तीसाठी २ कोटी रुपये मंजुर केले. पावसाळा उघडूनही संबधीत विभाग दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून संघटनेच्या वतीने श्रमदान करुन खड्डे बुजविण्यात आले. - भगवान मधे, सरचिटणीस, श्रमजीवी संघटना.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: filled up potholes with shramdan in nashik