येवल्यात खरिपाच्या पिकात पन्नास टक्के घट, शेतकरी आर्थिक विवंचनेत

येवल्यात खरिपाच्या पिकात पन्नास टक्के घट, शेतकरी आर्थिक विवंचनेत

येवला: लाखो रुपये भांडवल गुंतवून अल्प पावसावरही घेतलेला खरीप हंगाम निम्याने संपल्यात जमा आहे. खरिपाच्या पिकांची अवस्था पाहता थोडाफार पाऊस पडला तरी उत्पन्नात 50 ते 60 टक्के घट होणार असून नाही पडला तर राखरांगोळी निच्छित आहे. त्यामुळे आता खरीपातून उत्पन्न नको पण गुंतवलेले भांडवल तरी मिळावे अशी आस बळीराजाला लागली आहे.

जिल्ह्याचा विचार करता येवल्यात पावसाअभावी शेतीचे भयानक चित्र निर्माण झाले आहे. येवला शहरात 92 टक्के पर्जन्यमान दाखवत असले तालुक्यची सरासरी काढली तर अवघा 280 मिमी पाऊस दिसतोय. प्रत्यक्षात सर्वच जलसाठे अद्यापही कोरडेठाक आहे. भूजलपातळीत यकिंचितही वाढ झालेली नसल्याने जलस्रोतांना पाणी उतरलेले नाही. यामुळे पाणीटंचाई गंभीर असून 50 वर गावांना टँकरची गरज भासत आहे. पालखेड कालव्याच्या आवर्तनाने 70 वर गावाचा पिण्याच्या प्रश्न सोडवला असून काही भागाला दिलासा मिळाला असला तरी वेळेवर पाणी न मिळाल्याने उत्पन्नात घट ठरलेली आहे.

अवर्षणप्रवण उत्तरपूर्व भागातील चाळीसवर गावात तर पिकांची वाट लागली असून खरिपासाठी गुंतवलेले पैसे हाती पडता की नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. सोयाबीन, मूग, उडीद ही पिके नांगरून मातीतच जाणार आहे तर मुख्य पीक असलेल्या मका व कापसाची वाढ निम्म्याने खुंटली आहे. तसेच कापसाच्या बोंडांची संख्या पाच ते सात, मकाचे बीटया अवघी दोन ते तीन लागलेली दिसत असून ही संख्या निम्म्याहून अधिक घटली आहे. पाऊस पडेल या आशेवर लाल कांदा लागवडीचा ही जुगार शेतकरी खेळलेत पण पावसाने उघडीप देऊन कडक उन पडल्याने कांद्याची रोपे वाफ्यातच मातीत चालली आहेत.

बाजरपेठही थंडगार
शेतीची पावसाभावी हलत बिघडल्याने याचा मोठा परिणाम बाजारपेठेवर झालेला आहे.खते बियाणे रोजगाराचा व्यवसाय ठप्प झालाच पण शेतकऱ्यांवर अवलंबून असलेली कापडासह, किराणा व इतर बाजारपेठा थंडगार पडल्या आहेत.

मंडळनिहाय पडलेला पाऊस
येवला - 400 मिमी
अंदरसूल - 221 मिमी
नगरसूल - 207 मिमी
पाटोदा - 281 मिमी
सावरगाव - 300 मिमी
जळगाव नेऊर - 190 मिमी
वार्षिक सरासरी पर्जन्यमान - 433 मिमी

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. खरीप पिकांचे उत्पादन अधांतरीच असून भरघोस उत्पादनाची शाश्वती मावळली आहे मात्र भांडवल तरी मिळावे ही अपेक्षा आहे. गणेशोत्सवात पाऊस आला तर ठीक नाहीतर पावसाच्या आशा मावळल्यातच जमा होईल. पाटपाण्याने बंधारे भरून दिले तर जनावरांना पाणी उपलब्ध होईल.- बबन शिंदे, शेतकरी, जळगाव नेऊर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com