फिंगर प्रिंट बेस ईव्हीएमने थांबेल बोगस मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

जळगाव - मतदानासाठी गेल्या काही वर्षांपासून बॅलेट पेपरचा वापर न करता ईव्हीएम मशिनचा वापर केला जात आहे. मात्र, अनेकवेळा या मशिनमध्ये त्रुटी असल्याने मतदान प्रक्रियेत गोंधळ होत असतो. या त्रुटी लक्षात घेऊन गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फिंगर प्रिंट बेस ईव्हीएम मशिनची निर्मिती केली आहे. या मशिनमध्ये पाच हजारांहून अधिक मतदारांची माहिती स्टोअर करता येऊ शकणार असून, बोगस मतदानाला देखील आळा बसणार आहे.

देवकर अभियांत्रिकीतील इलेक्‍ट्रॉनिक ॲण्ड टेलिकम्युनिकेशनच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प तयार केला आहे. यात गणेश राजपूत, गौरव चौधरी, रोहन कुलकर्णी, कुणाल पाटील व सुमीत भावसार या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील, उपप्राचार्य प्रा. सी. एस. पाटील, विभागप्रमुख प्रा. आर. आर. कडुहे, प्रा. ए. एन. शेवाळे यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, जर एखाद्या केंद्रावर कोणी गोंधळ घातला किंवा गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास केंद्र अधिकारी एक विशिष्ट कोड टाकून मुख्यालयावर संदेश पाठवून अतिरिक्त मदत मागू शकतो, तोपर्यंत मशिन देखील टेक्‍निकल एरर असा संदेश देत काम करणार नाही.

अशी आहे यंत्रणा
या मशिनमध्ये अगोदरच मतदारांचे आधार कार्ड नंबर व फिंगर प्रिंट स्टोअर केलेले असतील. जेव्हा अधिकृत मतदार मतदान केंद्रांवर जाईल तेव्हा तो फिंगर प्रिंट सेंसरवर बोट ठेवताच त्याचा आधार क्रमांक व नाव त्या डिस्प्लेवर येईल. तेव्हाच ईव्हिएम मशिन ॲक्‍टिव होईल व त्याचे मतदान नोंदविले जाईल. परंतु जर अनधिकृत बोगस मतदार या केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी फिंगर प्रिंट सेंसरवर बोट ठेवताच ‘अनव्हॅलिड वोटर’ असा संदेश मशिनच्या डिस्प्लेवर दर्शविला जाईल. अन्‌ अर्लाम वाजू लागेल. आवाज येताच होणारे बोगस मतदान रोखता येईल.

Web Title: finger print base evm machine bogus voting