चाळीसगाव येथे 132 केव्ही सबस्टेशनला आग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

चाळीसगाव-  शहरातील खडकी बुद्रुक येथे असलेल्या वीज वितरण कंपनीच्या 132 केव्ही सबस्टेशनला आज रात्रीच्या साडेदहाच्या सुमारास आग लागली. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की 5 ते 7 किलोमीटरवरून आगीचे लोळ दिसत होते. आग लागल्यानंतर वीजपुरवठा खंडित होताच संपूर्ण शहरासह तालुक्यात अंधार झाला झाला.

या सबटेशनवरून रेल्वेला देखील वीजपुरवठा असल्याने रेल्वेसेवा देखील काही काळ विस्कळीत झाली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून घटनास्थळी अग्निशमन दल व वीज वितरण कंपनीचे अधिकारी दाखल झाले आहेत.

Web Title: Fire at 132 KV substation at Chalisgaon