
Nandurbar : आयान कारखान्याच्या आगीत 11 कोटीची मळी खाक
नंदुरबार : तालुक्यातील समशेरपुर येथील आयान साखर कारखान्यातील (Ayan Sugar Factory) मळीला लागलेल्या आगीत सुमारे अकरा कोटीचे नुकसान झाले. आज सकाळी ही आग लागली. ही आग आटोक्यात आली असून कुठल्याही प्रकारे जीवितहानी झाली नाही, अशी माहिती कारखाना व्यवस्थापनातर्फे देण्यात आली. (fire at Ayan Sugar Factory at Samsherpur caused loss of Rs 11 crore Nandurbar News psl98)
समशेरपुर येथील आयान मल्टीट्रेड एल.पी.युनिट या साखर कारखान्यात साखर उत्पादन होत आहे. वाढलेल्या उष्णता तापमानामुळे टाकीतील मळी जळून खाक झाली. साखर कारखान्याच्या टाकीतील मळीने उष्ण तापमानामुळे आज सकाळी पेट घेतला. ही बाब कारखाना प्रशासनाच्या लक्षात येताच अग्निशमन बंब च्या साहाय्याने कर्मचाऱ्यांनी तत्काळ पाणी चे फवारे मारले. सकाळची वेळ होती. त्यामुळे आग तत्काळ आटोक्यात आली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. कारखाना प्रशासनाच्या म्हणण्यानुसार मळी हे ज्वलनशील पदार्थ असल्याने वाढलेल्या उष्णतेमुळे पेट घेतात. त्यामुळे टाकीतील नऊ हजार ८०५.४०० मेट्रिक टन मळी जळून खाक झाली. मळी जळाल्याने कारखान्याचे सुमारे दहा ते अकरा कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.