सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या भातोडे जंगलास आग

दिगंबर पाटोळे
शनिवार, 12 मे 2018

वणी (नाशिक) : सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या भातोडे येथील जंगलास गुरुवारी (ता. 10) रात्री आग लागून लाखोंची वनसंपत्ती जळून खाक झाली आहे. दरम्यान भातोडे ग्रामस्थांनी सतर्कता दाखवून तीन तासांनी लागलेली आग आटोक्यात आणली आहे.

वणी (नाशिक) : सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या भातोडे येथील जंगलास गुरुवारी (ता. 10) रात्री आग लागून लाखोंची वनसंपत्ती जळून खाक झाली आहे. दरम्यान भातोडे ग्रामस्थांनी सतर्कता दाखवून तीन तासांनी लागलेली आग आटोक्यात आणली आहे.

भातोडे येथील ग्रामस्थांनी 40 ते 45 वर्षांपासून वनविभागाच्या अखत्यारीतील सुमारे 210.356 हेक्टर असलेली जंगल वनसंपत्तीचे संवर्धन केले आहे. त्यात दोन वर्षांत भातोडेकरांनी 10 हजार वनौषधी वनौषधी वनस्पतींची लागवड करुन संवर्धन केले होते. काल (ता. 10) रात्री आठ वाजेच्या दरम्यान जंगलातील वेगवेेगळ्या भागात चार ठिकाणी आग लागली. आग लागल्याचे कळताच गावातील दीडशे - दोनशे तरुणांनी घटनास्थळी धाव घेवून झुडपे व मातीच्या साह्याने तीन तास प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश मिळविले. दरम्यान ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून आग नियंत्रणात आणली असली तरी जगंलातील साग, बेहडा, मोह, आवळा, अश्वगंधा, सादडा, धामडा, पळस अशी औषधी वनस्पती बरोबरच गवत जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वनपाल दळवी यांनी रात्री घटनास्थळी धाव घेवून चौकशी केली. 

भातोडे ग्रामस्थ गेल्या पन्नास वर्षापासून वनसंपदेचे रक्षण करीत आहे. मात्र काही समाजविघातक घटक जाणीवपूर्वक जंगलास आग लावून ग्रामस्थांनी जीवापार जपलेल्या जंगलास आग लावीत आहे. या कृत्यामूळे ग्रामस्थ सतंप्त आहेत. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी वनविभागाच्या मदतीने वनक्षेत्रात २४ तास वॉचमनची नियुक्ती करण्यासाठी ग्रामस्थ व समिती प्रयत्नशील आहे.

- सुनिल जोपळे, अध्यक्ष वन व्यवस्था समिती भातोडे

पंधरा दिवसांपूर्वी रात्री अडीच वाजेच्या दरम्यान जंगलास आग लागली होती. त्यावेळीही गावातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेवून आग विझवली होती. भातोडेकरांनी मोठ्या कष्टाने राखलेली वनसंपदेची राज्यपातळीवर राज्यपाल, वन विभागाकडून गौरव होत असतांना समाजकटंकाकडून आग लावण्याच्या घटना भातोडेकरांच्या जीवाला आग लावणारी आहे.

दशरथ महाले, ग्रामस्थ भातोडे

Web Title: fire at base forest of bhatode in saptashrungi