नाशिक - किकवारी खुर्द येथील ब्राम्हणदर डोंगरास आग

रोशन भामरे
शनिवार, 24 मार्च 2018

तळवाडे दिगर (नाशिक) : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात डोंगरांना आगी लागण्याचे सत्र थांबता थांबत नसून आज (ता.२४) किकवारी खुर्द येथील ब्राम्हणदर डोंगराला दुपारी आग लागली आहे. गेल्या पंधरा दिवसातील डोंगरांना आग लागण्याची ही पाचवी घटना आहे.

तळवाडे दिगर (नाशिक) : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात डोंगरांना आगी लागण्याचे सत्र थांबता थांबत नसून आज (ता.२४) किकवारी खुर्द येथील ब्राम्हणदर डोंगराला दुपारी आग लागली आहे. गेल्या पंधरा दिवसातील डोंगरांना आग लागण्याची ही पाचवी घटना आहे.

जैवविविधतेने नटलेल्या आणि अनेक प्राणी-पक्षी यांचे आश्रयस्थान असलेल्या बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील डोंगरदऱ्यांत आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक जीव-जंतू आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नष्ट होऊ लागले आहेत. तर शेकडो एकर गवत जळून खाक केले जात आहे. तालुक्यातील पश्चिम पट्यातील तळवाडे, भवाडे, किकवारी, मोरकुरे, पठावे, कंधाणे, डांगसौदाणे आदी गावातील काही खाजगी क्षेत्र तर वनक्षेत्र असलेल्या डोंगरांना सर्रास आगी लावण्याचे सत्र सुरूच आहे. गेल्या पंधरा दिवसातील ही पाचवी घटना असून यावर वनविभागातर्फे कोणतेही पाउल उचलले जात नसल्याचे दिसत आहे.

या आगीत शेकडो  हेक्टरवरील गवत, झाडे-झुडपे,औषधी वनसंपत्ती नष्ट होत असून प्राणी पशु पक्षी, जीव जंतू या निष्पाप जीवांचा बळी जात आहे. परिसरात अशा घटना वारंवार घडत असताना देखील प्रशासनाकडून कोणतेही पाऊले उचलले जात नाही.

उन्हाळा सुरु झाला आणि पावसाळा जवळ आला कि या परिसरात असे वणवे दरवर्षी पेटू लागतात पूर्वीचे गवत जाळल्यामुळे पावसाळ्यात येणारे गवत हे चांगले येते. या समजुतीने असे प्रकार सर्रास घडतात. काही विकृत माणसे आगी लावण्याचे काम करतात. एकदा आग लागली कि शेकडो हेक्टर परिसरात ती पसरते. अनेकदा ही आग संपूर्ण जंगलातील डोंगरदऱ्यांत मार्गक्रमण करते. व दोन ते चार दिवस देखील ही आग आटोक्यात येत नाही व त्यामुळे पर्यावरनाचा मोठ्या ऱ्हास होताना दिसत आहे. 

बागलाणच्या पश्चिम भागातील शेकडो हेक्टर क्षेत्र आगीच्या भक्षस्थानी पडले असून त्यात शेकडो लहान मोठी झाडे झुडपे जळून खाक झाली आहे.मात्र सरकार कोटीच्या कोटी झाडे लावण्याच्या घोषणा करत आहे मात्र जी झाडे आहेत ती वाचण्याचासाठी कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही.

सध्या मोठ्या प्रमाणात डोंगरांना आग लागण्याचे सञ सुरु आहे, पाऊस पडल्यानंतर गवत चांगले उगवेल व जंगलातील काटे जळुन जातील या उद्देशाने काही विध्वंसक वृत्तीचे माणसं जंगलांना आगी लावण्याचे काम करता आहेत माञ त्यामुळे लहान व मोठे झाडे जळुन वनसंपत्तीचा व वन्यजीवांचा ऱ्हास होत आहे. वनविभागाने ही गोष्ट थांबण्याकामी कठोर पाऊले उचलुन जनजागृती करण्याचे काम करावे, असे यशवंत  धोंडगे यांनी सांगितले. 
    

Web Title: fire at brahmindar hill in kikvari khurd nashik