दुष्काळी परिस्थितीत चारा जळून खाक

दीपक कच्छवा 
शनिवार, 1 जून 2019

कृष्णापुरी तांडा येथील पदमसिंग जाधव यांच्या चार्याबरोबर गोरा देखील या आगीत जखमी झाला आहे.घटनास्थळी तहसीलदार अमोल मोरे यांनी भेट देऊन पाहणी केली. तलाटी श्रीमती सोनवणे यांनी पंचनामा केला.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) :- कृष्णापुरी तांडा (ता.चाळीसगाव) येथील पदसिंग जाधव यांचा सुमारे २५ हजार रुपयाचा चारा जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली. दुष्काळी परिस्थितीत चारा जळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.या आगीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. 

कृष्णापुरी तांडा येथील पदमसिंग जाधव यांच्या चार्याबरोबर गोरा देखील या आगीत जखमी झाला आहे.घटनास्थळी तहसीलदार अमोल मोरे यांनी भेट देऊन पाहणी केली. तलाटी श्रीमती सोनवणे यांनी पंचनामा केला.

लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी श्री जाधव यांनी केली आहे. त्यांच्याकडे चारा शिल्लक नसल्याने दोन बैल चार वासरे आणि एक गाय असे पशुधन आहे.त्यांना चारा कुठून आणावा आसा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान कृष्णापुरी तांडा येथे चारा छावणी सुरू करावी अशी मागणी होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fire on fodder in Chalisgaon