नांदगाव: आगीत तिनशे क्विंटल कांदा जाळून खाक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

दरम्यान या घटनेत कांदाचाळी शेजारी असलेल्या झाडाच्या सावलीत दीपक शेलार यांच्या दोन दुभत्या गायी व दिलीप जाधव यांचे दोन बैल बांधण्यात आलेले होते. अचानक लागलेल्या आगीत हि मुकी मजनावरे मोठ्या प्रमाणात होरपळल्याने गंभीर जखमी झाले. तलाठ्याला घटना कालवून देखील उशीरपर्यंत ते पंचनाम्याला आलेले नव्हते. त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा मिळू शकला नाही. पंचात समितीच्या सदस्य विद्याताई शेलार यांनी घटनास्थळ भेट दिली ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

नांदगाव : तालुक्यातील सावरगाव येथे शार्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे तीनशे क्विंटल कांदा जाळून खाक झाला, तर चार जनावरे होरपळून गंभीर जखमी झाले.

दुपारी दोन अडीचच्या सुमाराला वाल्मिक धात्रक यांच्या शिवारातील कांदा चाळीत हा प्रकार घडला. धात्रक यांच्या कांदा चाळीवरून उच्च दाबाच्या वीजप्रवाहाच्या वाहिन्या गेलेल्या आहेत. त्यातून अचानक आलेल्या वाऱ्यामुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आगीचे लोळ खाली असलेल्या कांदा चालीवर पडले. वारा असल्याने या आगीने लगेचच रौद्र स्वरूप घेतले. ऐन दुपारच्या कडक उन्हात लागलेल्या आगीला आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

दरम्यान या घटनेत कांदाचाळी शेजारी असलेल्या झाडाच्या सावलीत दीपक शेलार यांच्या दोन दुभत्या गायी व दिलीप जाधव यांचे दोन बैल बांधण्यात आलेले होते. अचानक लागलेल्या आगीत हि मुकी मजनावरे मोठ्या प्रमाणात होरपळल्याने गंभीर जखमी झाले. तलाठ्याला घटना कालवून देखील उशीरपर्यंत ते पंचनाम्याला आलेले नव्हते. त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा मिळू शकला नाही. पंचात समितीच्या सदस्य विद्याताई शेलार यांनी घटनास्थळ भेट दिली ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

Web Title: fire in Nandgaon