साईआनंद स्वीट सेंटरला 'शॉर्टसर्किट'मुळे आग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

धुळे - शहरातील पाचकंदीललगत ऊस गल्लीतील गोळ्या- बिस्किटांच्या दुकानाला आज दुपारी "शॉर्टसर्किट'मुळे आग लागली. आगीत दुकानातील मालासह फर्निचर खाक झाले. यात सुमारे एक ते दीड लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

पंकज जाजसनिया यांच्या मालकीचे ऊस गल्लीत गोळ्या- बिस्कीट विक्रीचे साईआनंद स्वीट सेंटर आहे. आज दुपारी दीडच्या सुमारास दुकानाला आग लागल्याचे काहींच्या निदर्शनास आले. परिसरातील नागरिक, व्यावसायिकांनी धाव घेतली. आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. आगीची माहिती महापालिकेच्या अग्निशामक दलाला देण्यात आली. दलाच्या तीन बंबांद्वारे आग विझविण्यात आली. आगीत दुकानातील गोळ्या, बिस्कीट, चहा पुडे, तेलाच्या बाटल्या आदी माल खाक झाला. फर्निचरसह विजेच्या जोडण्याही खाक झाल्या. यात एक ते दीड लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आझादनगर पोलिसांकडून माहिती मिळविण्याचे काम सुरू होते.

Web Title: fire in Saianand sweet centre

टॅग्स