चाळीसगाव तालुक्यात आग लावून झाडांची कत्तल!

दीपक कच्छवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

वृक्षांना सांभाळण्याची जबाबदारी कुणाची ?
शासनाने  गतवर्षी 4 कोटी वृक्ष लागवड केली होती. परंतु लागवड केलेल्या वृक्षांना साभाळण्याची जबाबदारी कुणाची? आजचा झालेल्या प्रकार चाळीसगाव  वनविभागाच्या अधिकार्यांच्या लक्षात आणुन दिला. ते म्हणाले  ती झाडे आमच्या अखत्यारीत येत नसून सार्वजिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले. यावरून वृक्षांची जबाबदारी कुणाची असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : एकीकडे 'झाडे लावा, झाडे जगवा' अशा विविध संकल्पना शासन राबवित असताना चाळीसगाव - धुळे महामार्ग लगतच्या झाडांना आगी लावण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या रस्त्यालगत असलेले झाडांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत आहे. आगी लावण्याचे कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी वृक्षप्रेमीनी केली आहे.

दरवर्षी शासन वृक्ष लागवडीचा आग्रह धरते. चालू वर्षात तर शासनाचे 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य आहे. झाडे लावली जातात; मात्र त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी शासन स्तरावर फार उपाययोजना होताना दिसत नाही. चाळीसगाव - धुळे महामार्गावर असलेल्या भोरस फाट्याजवळ आज दुपारी दिडच्या सुमारास रसत्याच्या कडेला अज्ञात व्यक्तीने आग लावुन दिली.या आगीत एक मोठे निंबाचे वृक्ष भक्ष्यस्थानी पडले. लावलेल्या आगीत झाडाचे खोड जळाले. शिवाय मोठी रहदारी असणाऱ्या महामार्गावर कुणीही झाडाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला नाही.त्यामुळे या रसत्याच्या कडेला असलेल्या वृक्षांचे आयुष्य धोक्यात आले असुन; दिवसेंदिवस त्यांची संख्या कमी होत आहे.काही महाभाग तर आग लावलेले झाड केव्हा जमीनीवर कोसळेल याचीच आतुरतेने वाट पहात झाडाझुडपात लपून बसलेले असतात. विविध कारणांसाठी केली जाणारी ही भरमसाट वृक्षतोड आता इतकी वाढली आहे कि यामुळे जंगलेच नष्ट होतात कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. वातावरणाच्या तापमानात वाढ झाल्याने त्याचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावरही व्हायला लागला आहे.

वृक्षतोडीमुळे जल, स्थल आणि वायूप्रदूषणही वाढले आहे. पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. मानवाला पिण्यायोग्य पाण्याचा मुख्य स्त्रोत ‘पाऊस’ असल्याने दुष्काळाची समस्या जाणवू लागली आहे. प्रदूषणामुळे बहिरेपणा, डोळ्यांचे विकार, श्वसनाचे आजार, हृदयविकार अशा आजारांत वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळते आहे.

आग लावण्याचे प्रकार नित्याचे 
मेहुणबारे ते चाळीसगाव या दहा किलोमीटर अंतरात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर निंबाची वृक्ष आहेत. या वृक्षाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीनी सर्रास दुर्लक्ष केले आहे. या रस्त्यावर वृक्षांना  कोणीच वाली नाही ? असे चित्र  दिसत आहे. आग लावण्यात आलेल्या वृक्षाची एकदम निवांत विल्हेवाट लावली जाते. 

वृक्षांना सांभाळण्याची जबाबदारी कुणाची ?
शासनाने  गतवर्षी 4 कोटी वृक्ष लागवड केली होती. परंतु लागवड केलेल्या वृक्षांना साभाळण्याची जबाबदारी कुणाची? आजचा झालेल्या प्रकार चाळीसगाव  वनविभागाच्या अधिकार्यांच्या लक्षात आणुन दिला. ते म्हणाले  ती झाडे आमच्या अखत्यारीत येत नसून सार्वजिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले. यावरून वृक्षांची जबाबदारी कुणाची असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: fire on tree in Chalisgaon