सटाण्याच्या उमाजीनगर आदिवासी वस्तीला आग ; पाच झोपड्या भस्मसात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

सटाणा  :  शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर देवळा रस्त्यावर ठेंगोडा (ता.बागलाण) शिवारात असलेल्या तुर्की हुडी दऱ्हाणे फाटा येथील उमाजीनगर या आदिवासी वस्तीला आज  (ता.२१) रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली.

सटाणा  :  शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर देवळा रस्त्यावर ठेंगोडा (ता.बागलाण) शिवारात असलेल्या तुर्की हुडी दऱ्हाणे फाटा येथील उमाजीनगर या आदिवासी वस्तीला आज  (ता.२१) रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली.

आगीत वस्तीतील पाच झोपड्या जळून खाक झाल्याने आदिवासी कुटुंबियांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. आगीमुळे अंदाजे ८ ते १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सटाणा पालिकेचा अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. प्रशासनाने तात्काळ आर्थिक मदत करून नुकसानग्रस्त कुटुंबियांना दिलासा द्यावा, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे. 

आदिवासी बांधवांची झोपडीवजा घरे आहेत. दिवसभर मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे सर्व आदिवासी बांधव आज पहाटे साखरझोपेत होते. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास वस्तीतील गोविंदा रामदास सोनवणे यांच्या झोपडीला अचानक आग लागली. परिसरातील सर्वच झोपड्या पाचटाच्या असल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण करत जवळच असलेल्या छगन रामदास सोनवणे, निंबा रामदास सोनवणे, वाल्मिक रामदास सोनवणे आणि रमेश मोतीराम माळी यांच्या झोपड्यांनाही आगीने तात्काळ कवेत घेतले. आजूबाजूच्या नागरिकांना आग लागल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले ; मात्र पाणी उपलब्ध होऊ न शकल्याने त्यांना आग विझविण्यात यश आले नाही.

काही नागरिकांनी तात्काळ सटाणा पालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यामुळे अग्निशमन बंब वेळेवर घटनास्थळी पोहचल्याने आग आटोक्यात आली. मात्र पाचही कुटुंबियांचे धान्य, कपडे, मोबाईल, दागिने, रोख रक्कम व संसारोपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाल्याने कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. घरातील सर्व वस्तूंसह शासकीय ओळखपत्रे, शिधापत्रिका व इतर कागदपत्रे देखील आगीत भस्मसात झाले आहेत. शासनाने आदिवासी बांधवांना मदत करावी अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे. दरम्यान, तलाठी वसंत शिरसाठ यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. 

 

  • कष्टाचा सर्व पैसा जळून खाक...

सर्व आदिवासी कुटुंब गुजरात राज्यात ऊसतोड मजूर म्हणून रोजंदारीवर काम करीत होते. काम संपल्याने पैसे घेऊन ते दोन दिवसांपूर्वीच घरी आले होते. मात्र आज पहाटे लागलेल्या आगीत या आदिवासी कुटुंबियांच्या कष्टाचा सर्व पैसा जळून खाक झाला. 

  • छगन सोनवणे बचावले मात्र उपचारांचे ५० हजार जळाले 

सध्या प्रचंड उन्हाळयाचे दिवस असल्याने पाचही कुटुंबीय आपापल्या झोपड्यांच्या बाहेर झोपले होते. त्यामुळे या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. छगन सोनवणे यांचा अपघात झालेला असल्याने ते झोपडीत झोपलेले होते. आग लागताच त्यांच्या तिन्ही भावंडांनी आत झोपलेल्या आपला भाऊ छगन सोनवणे यांना जीवाची पर्वा न करता झोपडीतून सहीसलामत बाहेर काढल्याने सोनवणे आगीतून सुरक्षितरीत्या बचावले. मात्र त्यांच्या उपचारांसाठी झोपडीत ठेवलेले रोख ५० हजार रुपये जळून खाक झाले.

  • आज होता जावळाचा कार्यक्रम 

चारही भावांच्या संसाराची राखरांगोळी झालेल्या सोनवणे बंधूंकडे आज जावळाचा कार्यक्रम होता. त्यासाठी सर्व तयारी देखील करण्यात आली होती. मात्र चारही झोपड्यांना अचानक आग लागल्याने जावळा…

Web Title: Fire in Ujaginagar tribal inhabited area; Fire five huts