भुसावळमध्ये नगरसेवकाच्या कुटुंबावर गोळीबार; 5 ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

भुसावळ शहरातील रेल्वे रुग्णालयामागील रहिवासी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात (वय 50) यांच्या राहत्या घरावर रविवारी रात्री दहाच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करीत हल्ला केला.

जळगाव : भुसावळ शहरात रविवारी रात्री दहाच्या सुमारास नगरसेवक रवींद्र खरात यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला करीत गोळीबार केल्याची घटना घडली. त्यात रवींद्र खरात यांच्यासह त्यांची दोन्ही मुले आणि पत्नीचा समावेश असून, त्यांचे बंधू सुनील खरात यांच्यावरही हल्ला झाला आहे. दरम्यान, या गोळीबारात नगरसेवक खरात यांच्यासह पत्नी दोन्ही मुले व त्यांचा भाऊ सुनील यांचा मृत्यू झाल्याचे समजते.

भुसावळ शहरातील रेल्वे रुग्णालयामागील रहिवासी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात (वय 50) यांच्या राहत्या घरावर रविवारी रात्री दहाच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करीत हल्ला केला. यात रवींद्र खरात यांच्यासह मुलगा प्रेमसागर, लहान मुलगा पिंटू, भाऊ सुनील खरात यांच्यावर गोळीबार आणि चाकू, तलवारींनी हल्ला चढवण्यात आला. त्यात सुनील खरात, प्रेमसागर रवींद्र खरात, पिंटू रवींद्र खरात हे ठार झाल्याचे समजते.

नगरसेवक खरात व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले होते. जखमींना तातडीने जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: firing on corporater family in Bhusawal 5 dead