नंदुरबार : केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील २०२२-२३ या शैक्षणिक सत्रासाठी तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रासाठी महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा)साठी १३+१ (यामध्ये वेंकटगिरीसाठी २ जागांचा समावेश आहे) च्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवडीसाठी प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांच्यातर्फे विहित नमुन्यात प्रवेश अर्ज १० जून २०२२ पर्यंत मागविण्यात आले होते. केंद्र शासनाच्या सुधारित कार्यक्रमानुसार त्यास ११ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले परिपूर्ण अर्ज ११ जुलैपर्यंत संबंधित प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करावेत. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक वस्त्रोद्योग उपायुक्त यांच्या कार्यालयातदेखील उपलब्ध आहे, असे वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली-उगले यांनी कळविले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.