पहिली ते दहावीसाठी 35 मिनिटांची तासिका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

रावेर - येत्या शैक्षणिक वर्षापासून नववीचा अभ्यासक्रम व पुस्तके बदलणार असून, पहिली ते दहावीच्या वर्गांसाठीच्या तासिका 30 ऐवजी 35 मिनिटांची करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

यासंदर्भातील निर्णय दोन वेगवेगळ्या परिपत्रकांत देण्यात आला आहे. या सर्वच वर्गांसाठी आठवड्याला 45 तासिका निश्‍चित केल्या आहेत, हे विशेष.

पुणे येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नववीबाबतीत केलेले बदल कळविले आहेत. नववीच्या वेळापत्रकात यापूर्वी 30 मिनिटांच्या 50 तासिका आठवड्याला होत्या. आता त्याऐवजी 35 मिनिटांच्या 45 तासिका एका आठवड्याला असतील. त्यात मराठी-6, हिंदी-6, इंग्रजी-6, गणित-7, समाजशास्त्र-7 (इतिहास, राज्यशास्त्र-4, भूगोल-3), आरोग्य व शारीरिक शिक्षण-2, स्वविकास व कलारसास्वाद-2, संरक्षणशास्त्र/एम. सी. सी./स्काउट/गाईड/एनसीसी/नागरी संरक्षण व वाहतूक सुरक्षा-2.

सोमवार ते शुक्रवार रोज 8 व शनिवारी 5 तासिका घेणे अपेक्षित आहे. तासिका वाटपात मुख्याध्यापकांना योग्य तो बदल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. दरम्यान, पहिली ते आठवीसाठीही आठवड्याला 35 मिनिटांच्या 45 तासिका निश्‍चित करण्यात आल्याचे दुसऱ्या एका परिपत्रकात कळविण्यात आले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (2017-18) ज्या शिक्षकांची नियुक्ती ज्या वर्गांसाठी केलेली असेल, त्यांना त्याच वर्गांना शिकविणे बंधनकारक केले आहे. यापूर्वी असे बंधन नव्हते.

Web Title: first to tenth 35 minit class