
पत्री शेडला आग लागून; 5 वासरे, 50 कोंबड्या मृत्युमुखी
आडगाव (जि. जळगाव) : आडगाव - पिंपरखेड रस्त्यावर सोमवारी (ता. २) दुपारी बाराला प्लॉट एरिया भागात श्यामा धना बारेला यांच्या पत्राच्या शेडमध्ये अचानक आग लागून गाईचे पाच वासरे व ५० कोंबड्या जळून मृत्युमुखी पडला.
तसेच शेडमधील आठ पोते धान्य चक्की, टीव्ही, फ्रीज, शिलाई मशीन व कपाटातील ८० हजार रुपये शेडच्या बाजूला असलेली दुचाकी जळून खाक झाली. तसेच संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.
हेही वाचा: जळगावच्या केळीवरून भर बाजारात दंगल; 2 जखमी, चौघांवर गुन्हा दाखल
संपूर्ण परिवार उघड्यावर आला. या आगीत १ हजार चाऱ्याच्या पेंढी जळून खाक झाल्या. बाजूचे प्लॉटधारक शिवराम महाजन यांचे पत्रांचे शेड व २० पोते ढेपची, पाचशे पेंढ्या चाराची कुट्टी, शेती अवजारे जळून खाक झाले. प्लॉटधारक शिवाजी महाजन यांचे ५०० पेंढ्यांचे नुकसान झाले. पाच ढेप पोते, ५० कॅरेट जळून खाक झाले. बाजूचे प्लॉटधारक हिरामण पाटील यांचे ५०० पेंढी चारा जाळून खाक झाला.
हेही वाचा: Jalgaon : लिंकवर क्लिक करताच खात्यातील रक्कम ‘सपाचट’
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या २ बंबांनी आग आटोक्यात आणली. स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ, तरुण, अनेक महिला पुरुषांनी आग विझविण्यास मदत केली. प्रशासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
Web Title: Five Calves 50 Hens Die Due To Fire Iron Shed In Aadgaon Village Jalgaon
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..