बनावट पाइप निर्यातप्रकरणी पाच कोटींचा दंड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

नाशिक - आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपनीच्या नावाच्या बोधचिन्हाचा गैरवापर करून बनावट पाइप निर्यात करणाऱ्या मुंबईच्या किशोर जैन व जितेंद्र बुरड या दोघांना मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. नाशिकचे वकील हिरेन कैलास कमोद यांनी या खटल्यात कंपनीची बाजू मांडली. 

तेल प्रकल्पात संवेदनशील कामासाठी परदेशी कंपन्या पोलादी पाइप मागवत असतात. सौदी अरेबियामधील यानबू स्टील कंपनीकडून एका तेल प्रकल्पासाठी असेच पाइप मागविले होते. मुंबईच्या किशोर जैन व जितेंद्र बुरड यांच्या "स्टील ट्यूब्ज इंडिया ऍण्ड राजदीप मेटल्स' या कंपनीतर्फे ते पाईप पुरवले होते. मात्र थोड्यात दिवसांत त्या पाइपचा दर्जा खराब असल्याचे सौदी अरेबियातील कंपनीच्या निदर्शनास आले. 

विशेष म्हणजे त्यांनी कंपनीला पुरविलेले पाईप "निप्पॉन स्टिल ऍण्ड सुमीटोमो मेटल कॉर्पोरेशन' या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपनीच्या नावाचे दिसत होते. त्यात त्या कंपनीचे बोधचिन्ह स्पष्ट दिसत होते. 

खराब दर्जाच्या पाईपबद्दल तक्रार ऐकून निप्पॉन कंपनीने त्यांचे कायेदशीर सल्लागार असलेल्या नाशिकच्या वकील हिरेन कैलास कमोद यांच्यामार्फत जैन व बुरड यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला. प्रारंभी जैन व बुरड यांनी "तो मी नव्हेच'चा प्रयोग करून पाहिला. नंतर मात्र त्यांचे पितळ उघडे पडले. 

प्रकरणात पोलिसातही तक्रा दाखल करता आली असती. मात्र हजारो कोटींची उलाढाल असलेल्या जपानी कंपनीने तो पवित्रा घेतला नाही. मात्र घसघशीत दंड झाला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. म्हणून पाच कोटी रुपये दंडावर हे प्रकरण मिटले. हे पाच कोटी रुपये कंपनीने टाटा मेमोरियल रुग्णालयाला दान केले आहेत. 
हिरेन कमोद, वकील 

Web Title: five crores penalty for export of fake pipe