नगरसेवक गोळीबार प्रकरणी पाचपैकी एकच अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

जळगाव - माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर गोळीबार प्रकरणात प्रमुख संशयित असलेल्या हटकर गॅंगच्या एका सदस्याला वरणगाव येथून अटक करण्यात आले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या पाच पैकी राहुल सुरेश हटकर याला बोदवड- जळगाव रस्त्यावर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना महिला पोलिस अधिकाऱ्याने झडप मारून ताब्यात घेतले. अटकेतील राहुल याला रामानंदनगर पोलिसांनी तब्बल ८९ दिवसानंतर अटक केली असून तो हद्दपारीतील अट्टल गुन्हेगार म्हणून पोलिस दप्तरी अंकित आहे. न्यायालयात हजर केल्यावर त्याची चार दिवस पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. 

गिरणा पंपिंग जवळील सौखेडा शिवारात ३१ डिसेंबरला माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर दुचाकीस्वारांनी गोळीबार करून पळ काढला होता. जखमी संतोष पाटील उपचारानंतर घरी परतले असून तालुका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात यापूर्वी चार संशयितांना अटक करण्यात आली असून संशयित लखन ऊर्फ लखीचंद नारायण हटकर याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. गुन्ह्यातील मुख्य संशयित बुधा दला हटकर, कैलास बुधा हटकर, आनंदा बुधा हटकर आणि ईश्‍वर किशोर तायडे आदी अद्यापही फरार आहेत. दाखल गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्याकडे असून गुन्ह्यातील अटक संशयितांविरुद्ध जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हटकर गॅंगच्या प्रमुख संशयितांपैकी फरार राहुल सुरेश हटकर यास बुधवारी रात्री ११.५५ वाजता अटक करण्यात आली. त्यास जिल्हा न्यायालयात नेले असता. न्या. खेडकर यांनी १५पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकारपक्षातर्फे ॲड. सुप्रिया क्षीरसागर यांनी काम पाहिले.

दुचाकीची किक..अन्‌ झडप 
गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार, राहुल हटकर हा वरणगावात दडून बसल्याची माहिती मिळाली होती. सहाय्यक निरीक्षक महेश जानकर यांचे पथक रवाना झाल्यावर बोदवड प्रभारी अधिकारी आणि वरणगावच्या महिला प्रभारी अधिकारी सारिका कोडापे आप-आपल्या पद्धतीने शोध घेत असताना. बोदवड जळगाव रोडवर राहुल त्याच्या सहकाऱ्याच्या दुचाकीवर बसला होता, त्याने दुचाकीची किक मारत वाहन सुरू करून निघणार इतक्‍यात कोडापे यांना धावत्या गाडीतून दिसला. गाडीतून उतरून त्यांनी झडप घालतच राहुलची गचांडी धरत ताब्यात घेतले.

संशयितांचे अटकपूर्व फेटाळले
गोळीबार प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल आहे. यातील फरार आनंदा बुधा हटकर, राहुल सुरेश हटकर यांनी अटकपूर्व तर अटकेतील आरोपी फारुख चाँदमिया पटेल यांनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात न्या. ओ. के.भुतडा यांच्या न्यायालयात अर्ज केले होते. त्यावर गुरुवारी कामकाज होऊन  न्या. भुतडा यांनी तिघांचे जामीनअर्ज नामंजूर केले आहेत.

Web Title: Five suspects in the corporator firing case in jalgaon