श्रमिकनगरला पाच वाहनांची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

सातपूर - सातपूर परिसरातील श्रमिकनगरमध्ये काल (ता. 26) रात्री गंगासागर व शनि मंदिराच्या परिसरात पाच वाहनांच्या काचा फोडण्याची घटना घडली असून, परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचा निषेध व्यक्त करीत नागरिकांनी टवाळखोर विकृत गुन्हेगारांचा बीमोड करण्याची मागणी केली आहे.

सातपूर - सातपूर परिसरातील श्रमिकनगरमध्ये काल (ता. 26) रात्री गंगासागर व शनि मंदिराच्या परिसरात पाच वाहनांच्या काचा फोडण्याची घटना घडली असून, परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचा निषेध व्यक्त करीत नागरिकांनी टवाळखोर विकृत गुन्हेगारांचा बीमोड करण्याची मागणी केली आहे.

सातपूर परिसरातील वाहनांच्या काचा फोडण्याची दीड महिन्यातील कालची ही तिसरी वेळ आहे. यातील सातपूर कॉलनीत सुमारे अकरा वाहने फोडण्याच्या घटनेतील आरोपींचा अद्याप तपास लागत नाही, तोच श्रमिकनगर भागातील गंगासागर भागातील व शनि मंदिराच्या भागातील दत्तात्रय पाटे यांच्या ओम्नी व्हॅन (एमएच 41 सी 5242), अरुण मोरे यांची लोगान (एमएच 4 डीडब्ल्यू 4988), श्‍यामदास बैरागी यांची ऍपे रिक्षा (एमएच 15 बीजे 6920), दिनकर पवार यांची बोलेरो पिकप (एमएच 15 जी 8215), सीताराम धोत्रे यांची इंडिका (एमएच 15 एएस 9340) अशा घराबाहेर लावलेल्या पाच गाड्यांच्या काचा मध्यरात्रीच्या सुमारास दगडाने फोडण्यात आल्या. नवरात्रोत्सव जवळ आला असतानाच विकृत गुन्हेगार पोलिसांच्या नाकावर टिच्चून अशा घटना करीत आहेत. पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपी तसेच त्यांना मदत करणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दोन्ही घटनांमध्ये साम्य
सातपूर कॉलनी व श्रमिकनगर या दोन्ही घटनांमध्ये साम्य असून, सातपूर कॉलनीच्या घटनेतील आरोपीच यामागे असावेत, असे बोलले जात आहे. या घटनेतील आरोपींना शोधण्यासाठी पोलिस सत्ताधारी पक्षातील काही कार्यकर्त्यांची चौकशी करू इच्छितात. पण, त्यांना त्यापासून रोखण्यात येत असल्याचीही चर्चा दबक्‍या आवाजात सुरू आहे. यामुळे विकृत गुन्हेगारांचा बीमोड कोण करणार, असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.

औद्योगिक क्षेत्रातील दुसरी शिफ्ट सुटल्यानंतर रात्री एकपर्यंत श्रमिकनगर भागात कामगारांची वर्दळ असते. त्यानंतर टवाळखोर गुन्हेगार परिसरात वावरत असतात. पोलिसांनी रात्री दोन ते सकाळी सहापर्यंत सायरन न वाजवता गस्त घातली तर या गुन्हेगारीला आळा बसेल.
- अरुण मोरे, नागरिक, श्रमिकनगर

Web Title: Five vehicles damaged

टॅग्स