एप्रिलमध्ये "स्वाइन'मुळे आतापर्यंत पाच बळी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

नाशिक - शहरात स्वाइन फ्लूचा उद्रेक अजूनही कायम आहे. एप्रिलमध्ये तब्बल 58 रुग्ण आढळले असून, मार्चच्या तुलनेत अधिक रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील खासगी रुग्णालयांत मोठ्या प्रमाणात स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महापालिकेच्या बिटको व डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात टॅमी फ्लूच्या गोळ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जानेवारीत दोन, फेब्रुवारीत शून्य, मार्चमध्ये 49, तर एप्रिलमध्ये स्वाइन फ्लूचे आतापर्यंत 58 रुग्ण आढळून आले आहेत. मार्चमध्ये 18, तर एप्रिलमध्ये पाच रुग्ण स्वाइन फ्लूने मृत झाले आहेत. स्वाइन फ्लू आजारासंदर्भात गेल्या आठवड्यात आरोग्य संचालकांनी बैठक घेऊन आढावा घेतला होता. 

Web Title: Five victims swine flu