विद्युत वाहिनीच्या झटक्याने 1 फ्लेमिंगो ठार; एकास जीवदान

flamingo.jpg
flamingo.jpg

वणी :  मातेरेवाडी, ता. दिंडोरी शिवारात उच्च दाबाच्या विदयुत टॉवर वाहीनीला धडकून एका दुर्मिळ फ्लोमिंगो पक्षाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी अवस्थेत असून सर्प  आणि पक्षी मित्राने प्राथमिक उपचार केला. तर पशुवैद्यकिय दवाखान्यात दाखल केल्याने एका फ्लेमिंगो पक्षाला जीवदान मिळाले आहे.

वाळु कोंबडे यांच्या शेतातून उच्च दाबाची विद्युत वाहीनी गेली आहे.  बुधवारी सांयकाळी ६ वाजेच्या दरम्यान वाळु कोंबडे हे शेतात काम करीत असतांना त्यांना शेतात मोठ मोठ्याने वेगळाच आवाज आल्याने आवाजाच्या दिशेन जावून बघीतले तर त्यांना दोन मोठे पक्षी शेतात पडलेले आढळले. ते काहीसे घाबरुन जावून सदरचा प्रकार मुलगा प्रविण कोंबडे यास सांगितला. यावेळी प्रविण याने घटनास्थळी धाव घेत गावातील सर्प आणि पक्षी मित्र असलेले दिपक धामोडे यांन याबातची  माहिती दिली.

यावेळी दीपक धामोडे यांनी सहकारी ऋषिकेश सुर्यवंशी व मयुर तांबे यांच्या समवेत घटनास्थळी हजर झाले. यावेळी त्यांना दोन फ्लेमिंगो पक्षी गंभीर जखमी अवस्थेत दिसले. त्यांनी लगेच मातेरेवाडी पशु वैदयाकिय अधिकारी डॉ. धनंजय दुगजे यांना तसेच  दिंडोरी येथील वन विभागाच्या कार्यालयात संपर्क करुन माहिती दिली. दरम्यान पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी एका  फ्लेमिंगो पक्षाचा मृत्यु झाल्याचे घोषित केले. तर दुसऱ्या पक्षाचा पाय मोडलेला आढळल्याने त्याच्यावर पशुवैद्यकिय दवाखान्यात उपचार केले.

यावेळी वनरक्षक ज्योती झिरवाळ आणि त्यांचे सहकारी वनरक्षक यांनीही घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. तर मृत फ्लेमिंगो पक्षास वनविभागाच्या हद्दीत असलेल्या जागेवर खड्डा करुन जमिनीत पुरण्यात आले. दरम्यान  पाय मोडलेल्या फ्लेमिंगो पक्षाला प्राथमिक उपचार केला. आणि त्यानंतर दिपक धामोडे, पशुवैद्यकिय अधिकारी तसेच नाशिक पुर्व वनविभागीय अधिकारी तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जखमी पक्षाला इको एको फाऊंडेशन या संस्थेच्या मदतीने नाशिक येथील सिद्धीविनायक हाॅस्पिटलमध्ये गंगापुर रोड येथे पुढील उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान हास्पिटलच्या पशु वैद्यकिय अधिकाऱ्यांनी पक्षाच्या पायावर शस्त्रक्रिया करीत पायाला, सळई टाकून प्लस्टर करीत पक्षाला जीवदान दिले आहे. दरम्यान पक्षाला इको एको फाऊंडेशन ही संस्था पक्षी पूर्णपणे बरा होई पर्यंत संगोपन आणि आवश्यक उपचार करणार आहे.  पक्षी बरा होवून आकाशात भरारी घेण्याची खात्री झाल्यानंतर त्याला जंगलात सोडून देण्यात येणार आहे. यासाठी संस्थेचे अरुण अय्यर, देविका भागवत, राहुल कुलकर्णी आदी प्रयत्नशिल आहे.

अग्निपंख ( फ्लोमिंगो ) या पक्षाचे इंग्रजी नाव आहे हा पक्षी पणथळ जागी थव्याने राहतात. हा पक्षी फिनिफोप्टोरस जातीतला असून भारतात परदेशी पक्षी म्हणून ओळखले जातो. आपलं खाद्य शोधण्यासाठी हे पक्षी हजारो किलोमीटर अंतरावरुन आपल्या भारतात येतात. त्याच मुख्य खाद्य छोटे मासे,किडे, पाणवनस्पती शेवाळे हे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com