पुनंद धरणामुळे गिरणा नदीला पहिल्याच पाऊसात पूर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

खामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून गिरणा खोऱ्यातील पुनंद परिसरात गेल्या दोन दिवसापासून संततधार  सुरु असल्याने पुनंद नदीला या पावसाळ्यातला पहिला पूर आला आहे. पुनंद खोऱ्यातील नाले, ओहोळ दुथडी भरून वाहू लागले असुन धरण क्षेत्रातील पाणीसाठा वाढल्याने धरणातून 1800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होऊ लागल्याने पुनंद नदीला पावसाळ्यातला पहिलाच पूर आला आहे. हे पाणी आज सायंकाळपर्यंत लोहोणेर गिरणा पुलापर्यंत येऊन पोहचल्याने सटाण्यासह देवळा पाणी पुरवठ्यासह शेती व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे चित्र आहे.

कळवण व गिरणा व पुनंद परिसरात काल मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली त्याबरोबर पश्चिमेकडील डोंगररांगांमधून पाण्याचे प्रवाह वाहू लागल्याने पुनंद खोऱ्यात सर्वच नाले ओढे वाहू लागल्याने पुनंद धरणाची पातळीत वाढ होत आहे.

पुनंद धरण क्षेत्रात गेल्या तीन चार दिवसात धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पुनंद धरणातील पाणीसाठ्यात चौदा टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑगस्ट अखेरीस पर्यंत धरणाचे गेट खुले राहत असल्याने धरणात पाणी साठा झाल्याबरोबर धरणातून उत्सर्ग होवू लागल्याने पुनंद नदीपात्रात अठराशे क्युसेस पाणी वाहत आहे. त्यामुळे व परिसारात्तील ओढे नाले वाहू लागल्याने पाण्यात वाढ झाल्याने गिरणा दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र सध्या खामखेडा परिसरात पहावयास मिळत आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने कळवणच्या पश्चिम भागात हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

पुनंद धारण परिक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणातून अठराशे क्युसेस उत्सर्ग होत आहे. पूर्वीचा पाणीसाठा 38.36 इतका होता. आज 51.66 साठा आहे.
- अशोक लोहकरे,शाखा अभियंता पुनंद धरण

Web Title: flood to girana river in first rain due to punand dam