अन आपत्कालीन परिस्थिती मध्ये जन्मली वर्षा

सागर आहेर
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

घोडेगाव, ता चाळीसगाव येथून सौ गीता व अशोक दळवे हे दाम्पत्य ऊस तोडणी करीता चांदोरीस आलेले.सुमारे सायंकाळी ६:३० च्या दरम्यान सौ गीता यांच्या पोटात दुखण्यास सुरुवात झालेली. या पूरपरिस्थिती मध्ये आरोग्य व्यवस्था उपलब्ध नव्हती.यावेळी दैनिक सकाळ चे स्थानिक बातमीदार सागर आहेर व माजी सरपंच दत्ता गडाख याना सदर परिस्थिती माहिती झाल्या नंतर तातडीने गावातीलच डॉ अर्चना कोरडे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

चांदोरी - गावातील सर्वच परिसरात पुराचे पाणी आलेले.आरोग्य व्यवस्थेसह वीज यंत्रणा ठप्प झालेली. पूर बाधित लोकांना स्थलांतर करण्यासाठी धावपळ.

घोडेगाव, ता चाळीसगाव येथून सौ गीता व अशोक दळवे हे दाम्पत्य ऊस तोडणी करीता चांदोरीस आलेले.सुमारे सायंकाळी ६:३० च्या दरम्यान सौ गीता यांच्या पोटात दुखण्यास सुरुवात झालेली. या पूरपरिस्थिती मध्ये आरोग्य व्यवस्था उपलब्ध नव्हती. यावेळी दैनिक सकाळ चे स्थानिक बातमीदार सागर आहेर व माजी सरपंच दत्ता गडाख याना सदर परिस्थिती माहिती झाल्या नंतर तातडीने गावातीलच डॉ अर्चना कोरडे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या बद्दल ची परिस्थिती प्रांत डॉ अर्चना पठारे व तहसीलदार दीपक पाटील यांना फ़ोन द्वारे सांगितले असता त्याच ठिकाणी पुढील उपचार करण्यास सांगितले. आवश्यकता भासल्यास बाहेरून औषधे उपलब्ध करून देण्यात येतील परंतु पुराचे वाढलेले पाणी बघता चांदोरीस प्रसुती करून जोखीम पत्करण्याची तयारी केली.

रात्री ८ च्या सुमारास साधारण प्रसुती होऊन कन्या रत्न जन्माला आले.त्यावेळी कन्येचे वजन ३:४०० किलो होते. बाळ व बाळंतीण सुखरूप असून सदर ची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना सांगितले असता त्यांनी त्या कन्येचे नाव वर्षा ठेवण्यास सांगितले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये सदर प्रसुती करण्यात आली सध्या बाळ व बाळंतीण दोघेही सुखरूप आहे.
- डॉ अर्चना कोरडे, कोरडे हॉस्पिटल चांदोरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Rain Born baby Varsha Life Saving Doctor