गिरणा नदीला महापूर; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

गिरणा धरणाच्या पाणलोट जोरदार पाऊस हाेत असल्याने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

भडगाव : गिरणा धरणाच्या पाणलोट जोरदार पाऊस बरसल्याने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

दरम्यान, सकाळी सात वाजता धरणातून 75 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. तर मन्याड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. लाभक्षेत्रात ही पाऊस बरसत असल्याने नदीपात्रात 90 हजार क्युसेकने पाणी असणार आहे. त्यामुळे गिरणा नदीला पुर आला आहे. 

गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी पाऊस झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. रात्रीपासून या पाण्यात सातत्याने वाढ होत आहे. धरणातून सकाळी सात वाजेपर्यंत 75 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्रकुमार बेहेरे यांनी सांगितले. तर मन्याड धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

शिवाय लाभक्षेत्रातही पाऊस सुरू असल्याने गिरणा नदीपात्रात 90 हाजार क्युसेकच्या जवळपास पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे दुपारपर्यंत गिरणा नदीला मोठा महापुर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन गिरणा पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे, चाळीसगाव उपविभागीय अधिकारी हेमंत पाटील, गिरणा धरण शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flooding the girana river