नांदगावच्या विदारकतेकडे लक्ष द्या अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

नांदगाव - दुष्काळामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची व शेती व्यवसायाची अवस्था गंभीर बनली असल्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय स्तरावर नियोजनाचा अभाव आहे. त्याबाबतचे नियोजन करावे तसेच दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी अन्यथा शिवसेनेला आपल्या स्टाईलने आंदोलन करावे लागेल असा इशारा आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे, जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे  यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांची भेट घेतली. त्यांचे तालुक्यात सध्या पाऊस नसल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थीकडे लक्ष वेधले. दुष्काळ सदृशता असूनही प्रशासन उदासीन असल्याने, कुठल्याही प्रकारची भूमिका घेत नसल्याने गांभीर्य वाढले असून शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळावा, गावनिहाय उपाययोजना कराव्यात, प्रत्येक गाव वाड्या वस्त्या वर टँकर सुरु करावेत अशा मागण्या यात करण्यात आल्या आहेत.

अत्यल्प पावसामुळे जनावरांसाठी चारा उपलबध नसल्याने चाऱ्यासाठीच्या छावण्या कराव्यात. तसेच थकीत वीज बिलांचे कारणे देऊन शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचं सपाटा सुरु असून, तो थांबवावा. विजे बिले माफ करावी, पिकविम्याची मुदत वाढवून द्यावी व तालुका दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळली पाहिजे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

शिष्टमंडळात तालुकाप्रमुख किरण देवरे, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, विष्णू निकम, बाजार समितीचे सभापती तेज कवडे, जिल्हा मजूर संघाचे संचालक प्रमोद भाबड, पुंजाराम जाधव शहरप्रमुख सुनील जाधव, वाल्मिक निकम दत्त गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्यने शिवसैनिक व शेतकरी यावेळी उपस्थित होते. 

Web Title: Focus on the insignificance of Nandgaon otherwise the Shiv Sena style movement