चारा, अन्नधान्याची पूर्ण तयारी - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

नाशिक - दुष्काळात राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने मदतीसह चारा अन्‌ अन्नधान्याची तयारी केली आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. तसेच महागड्या उपचार पद्धतीमुळे सामान्य माणूस जगण्याची आशा सोडून देतो. त्यावर उपाय म्हणून प्रत्येकाला उपचाराचा अधिकार मिळवून देण्यासाठी सरकार स्वतः खर्च करून वैद्यकीय सेवा सामान्यांपर्यंत पोचवत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

खानदेशची कुलदैवत सप्तशृंगीदेवी गडाच्या पायथ्याशी नांदुरी येथे दिंडोरी, देवळा, बागलाण, सुरगाणा व कळवण तालुक्‍यांतील रुग्णांसाठीच्या अटल ग्रामीण महाआरोग्य शिबिराच्या उद्‌घाटनावेळी फडणवीस बोलत होते.

Web Title: Fodder Food FUll Preparation Devendra Fadnavis