कर्मचारी भरतीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

नाशिक - महापालिकेतील रखडलेली कर्मचारी भरती प्रक्रियाप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून, त्याबाबत आकृतिबंध आराखडाही शासनाकडे पाठविण्यात आला आहे. महापौर रंजना भानसी यांनी ही माहिती दिली. 

कर्मचारी भरतीसाठी लवकरच पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात येणार आहे. आमदार बाळासाहेब सानप हेही याप्रश्‍नी पाठपुरावा करीत आहेत. महापालिकेत १२ वर्षांपूर्वी कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेत कुठल्याही प्रकारची भरतीप्रक्रिया झाली नाही. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याने अनेक विभागांचा प्रभारी पदभार अधिकाऱ्यांना दिला आहे. मेमध्ये ४० हून अधिक कर्मचारी निवृत्त झाल्याने रखडलेल्या कामांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे या संदर्भात आढावा घेण्यात आला असून, त्यासंबंधी आकृतिबंध शासनाकडे पाठविण्यात आला. त्याचा पाठपुरावा घेण्यात येत आहे.

महापालिकेत कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आमदार सानप पाठपुरावा करीत आहेत. यासाठी पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावण्यात येणार असल्याचे महापौर भानसी यांनी सांगितले.

Web Title: Follow-up to the Chief Minister for staff recruitment